मराठा समाजाचा विकास खुंटला तो, त्यांच्या राजकारणाच्या व्यसनामुळे. ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपले खिसे भरून घेतले. त्यांनी सतराशे साठ घोटाळे, भ्रष्टाचार करून आपली घर पैशाच्या पोत्यांनी भरली आणि दुर्दैवाने मराठा समाज अशाच लोकांना त्यांचा आदर्श मानू लागला..फास्ट पैसा… गाडी, बंगला, पाटीलकी, नाव, इज्जत, मान या गोष्टींसाठी मराठा समाज राजकारणात उतरून कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवू लागला..आणि या सगळ्या गोष्टींमधून त्याला सवय लागली ती ‘सगळं आयतं, फुक्कट’ मिळवण्याची..!
मेहनत नको.. बुद्धी वापरायला नको.. गावा-गावात मंडळं उभी करायची… गावाचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा.. आपलं नाव मोठं करून घ्यायचं कि संपलं..! मग लागलाच भिक मागायला राजकीय पक्षांकडं अन नेत्यांकडं तिकिटासाठी. मग त्यांचे तळवे चाटण आलंच…खोटी आश्वासनं.. दिशाभूल करणं .. सगळ्या गावाला राजकारण्याच्या धंद्याला लावण.. गावामध्ये भावकीत भांडण लावून देणं.. फुट पाडण हे सुद्धा आलंच.. मग गावं कसं एक राहील? आणि कसा आपला मराठा समाज हा एक- “समाज” म्हणून एकत्र येऊन एकमेकांना मदत करेल?
हे राजकारणी गावा-गावांमध्ये, भावकी-भावकीमध्ये भांडण लावून देणार.. मतासाठी फोडाफोडी करणार.. एकमेकाच्या मळ्यातल-शेतातलं पाणी अडवून धरणार.. शेताचा बांध फोडायला लावणार.. मग कसा आपला मराठा शेतकरी समाज तरी एकोप्यानं राहील..? गावात तरुण पोरांना हाताशी ठरून मंडळ स्थापन करायची… क्रिकेट च्या म्याचेस लावायच्या.. मग तरुण पोर्र पण राजकीय पक्षांच्या नावाखाली ‘ब्यानरबाजी’ सुरु करतात.. अगदी ५-६ वी मधल्या पोरांपासून पस्तीशी मधल्या तरुणांपर्यंत सर्वांची मुंडकी दिसतील अशा प्रकारे २५-३० जणांचे फोटो असणारे ब्याणार लावायचे.. अगदी गावच्या हागणदारी पर्यंत मग भिडतात आपलीच पोरं आपल्यात..कशासाठी..? राजकारणासाठी.. या राजकीय नेत्यांसाठी.. !
दारू पाजणारे हे पुढारी..आपल्या पोरांना मारामाऱ्या करायला पाठींबा देणार आणि निवडणुकीच्या वेळी त्याचा प्रचाराला उपयोग करून घेणार..आपला पोरगा मात्र हीच दुनियादारी करत बसतो..गावचं राजकारण त्याला पुरत लुबाडून टाकत..ना तो नीट शिक्षण घेत..ना तो नोकरी धंद्यात सेटल्ड होत..मग जातो वाया..आई-बाप..पोरगा वाया जायला लागला म्हणून फसवून कुणाच्या तरी पोरीला गळाला लावतात..मग आमच्या तरुण मराठा पोरांचे बढवलेले बैल होतात . बिनकामाचे..!
बोला.. अजून नादाला लागायचं आहे का राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या.? ब्राह्मणांना शिव्या घालून त्यांची काय वाकडी झालीयेत .?? ब्राह्मण समाज त्यांच्या बुद्धीने शिक्षण, नोकरी व व्यवसाय क्षेत्रात प्रगती करतोच आहे. १९४८ मधे नथुराम गोडसे या ब्राह्मणाने महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर देशातील समस्त ब्राह्मण समाजाची घरे जाळण्यात आली..त्यांना बेघर केलं गेलं.. ते गावोगाव सोडून शेतीवाडी जमीनजुमला सोडून शहरांकडे विदेशात निघून जाऊ लागले. आजही तुम्हाला गावागावांत अगदी एखाददुसरं ब्राह्मणाच घर दिसेल…
तर मग कळीचा सवाल हा आहे कि, गेल्या ६५ वर्षे महाराष्ट्रातील ४५,००० खेड्यागावांमध्ये ब्राह्मण नसताना मराठा समाजाची अधोगती कुणी केली..? ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, आमदार, खासदार कुणाचे होते..? सगळे मराठाच होते ना..? का मग मराठा समाजाची अधोगती का झाली..? त्यांना शिक्षणापासून वंचित कुणी ठेवलं?? खेड्यापाड्यात मराठ्यांची सत्ता असून देखील त्यांचा विकास का झाला नाही…?? बऱ्याच मार्केट मध्ये हमाल म्हणून काम करणारे मराठा तरुणच का ? राजाचे हमाल कसे झाले..? कोणी केले..? याला जिम्मेवार कोण..? मग मराठा समाजाला शेंडी लावणारे कोण ब्राह्मण कि मराठा नेते..? म्हणून मराठा समाजाने अन्य कुठल्याही समाजावर टीका, द्वेष करीत न बसता अन्य सर्व समाजांना मित्र बनवून .. आपल्या मराठा समाजातील तरुण मंडळींनी एकमेकांचा आधार घेत शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी.
मराठा समाजाच्या अधोगतीचे कारण ब्राह्मण, मागासवर्गीय किंवा अन्य कोणताही समाज नसून..सत्तेत असून सुद्धा मराठा समाजाला आधार न देणारे.. मराठा तरुणांच्या शिक्षण-नोकरी मध्ये मदत न करणारे आणि मराठा शेतकऱ्यांना वार्यावर सोडणारे आपले मराठा नेते आहेत.मराठा समाजाने आपल्या समाजातील नेत्यांना दोषी न धरता अन्य कोणत्याही समाजावर स्वतःच्या अपयशाचे खापर फोडणे म्हणजे..साप सोडून भुई धोपटणे होय..वेळीच जागृत होऊन एकत्र झालो नाहीत तर राजाचे हमाल झालेत पण येणारी जनरेशनचे काय होईल याचा विचार कराल हि अपेक्षा. वर्तमानात समाजात लाखो करोडों फक्त शिवाजी आहेत, परंतु एक हि “छत्रपती शिवरायां सारखे ” काम करताना दिसत नाहीत.
वैचारिक सिद्धांत पायदळी तुडवणारे उथळ आणि स्वयंघोषीत नेते मराठ्यांच्या अधोगतीस आजवर कारणीभुत ठरलेत आणि यापुढेही ठरतील.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर मराठा समाजाचा स्वःतावरील रोष मराठा नेत्यांवरच उलटवला.
असं म्हणतात की..” मराठे युद्धात जिंकतात पण तहात हरतात” पण आजची परिस्थिती पाहून वाटतंय की तहात मराठा समाज हरला.. आणि स्वयंघोषित मराठा नेते जिंकले.. पण या संधीसाधू नेत्यांमुळे मराठा समाज अजून एकजूट होणार.पण ह्या पुढे ह्या मराठा नेत्यांना समाज कधीही माफ करणार नाही.
Leave a Reply