।। बटवे नम: दाडीमपत्रं समर्पयामि।।
डाळींब हे फळ जितके पौष्टीक तितकेच दिसायला आकर्षक असून त्याची आंबट गोड चव आपल्या सर्वांनाच आवडते.जसे हे फळ रूचकर लागते तसेच ते औषधी गुणांनी परिपूर्ण अाहे म्हणूनच ह्याची पाने पत्रीमध्ये समाविष्ट केली आहेत.
ह्याचे ३-५ मीटर उंचीचे वृक्ष असते.काण्ड त्वचा धुरकट तांबडी असते व गुळगुळीत असते.पाने ५-७ सेंमी लांब व तीन सेंमी रूंद असून दोन्ही टोकास निमुळती असतात.फुले लाल एकल अथवा क्वचित २-४ च्या गुच्छात असतात.फळ गोल,५ सेंमी व्यासाचे व भरपूर कोष युक्त असते.फलत्वचा चिवट असते.
ह्याचे उपयुक्त अंग आहेत फलत्वचा,मुलत्वचा,व फल.ह्याची चव गोड,तुरट,आंबट असून हे अनुष्ण गुणाचे असते तसेच हल्के व स्निग्ध असते.हे शरीरातील तिन्ही दोष शमन करते.
चला आता ह्याचे उपयोग पाहूयात:
१)सालीचा काढा जखम धुवायला तसेच घशाच्या रोगात उपयुक्त आहे.
२)उल्टी मळमळ ह्यात फळाचा रस उपयुक्त आहे.
३)कृमींवर डाळींबाच्या मुळाचा काढा उपयुक्त आहे.
४)जुलाब होत असल्यास सुकवलेली डाळींबाची साल उपयुक्त आहे.
६)डाळिंबाचे फळ हृदयास हितकर असून रक्त वाढवायला मदत करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply