नवीन लेखन...

पोप आणि नोकर

(रशियन लोककथा)

एका गावात एक पादरी (धर्मगुरू) राहत होता. त्याने एक नोकर ठेवला होता.

अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता.

वेळ भराभर निघून जात होता. पोप साहेबांनी पाहिले की, नोकर प्रत्येक काम सुंदर आणि व्यवस्थित रीतीने पार पाडीत आहे. पोप महाराज समजून गेले की, हा नोकर त्यांना संकटांनी वेढून टाकणार आहे. त्यांनी नोकरापासून आपला बचाव करण्यासाठी एक मार्ग काढला.

गावा शेजारच्या जंगलात फार मोठ्या संख्येने अस्वले राहत होती. त्याने नोकराला एक अस्वल पकडून आणण्यास सांगितले. नोकर जंगलात गेला व त्याने एक अस्वल पकडून आणले. घरी येताच त्याने पोपला विचारले- “पोप महाराज, कुठे ठेवू या अस्वलास?” पोप भयंकर संकटात पडला. त्याने आपली सुटका करून घेण्यासाठी – “अस्वलास गाडीला बांधून घे आणि माझे कर्ज वसूल करण्यासाठी जा. माझ्या कर्जदार प्राण्यात एक भूत आहे. ते डोहात राहते, समजलास?” पोपच्या आदेशानुसार नोकर डोहाजवळ गेला. त्याने अस्वलास सोडले आणि आपल्याजवळ फिरू दिले. त्याच्याजवळ ताण होता.

त्याची तो दोरी तयार करू लागला. भूताचा मुलगा पाण्याच्या बाहेर आला.

त्याने नोकरास विचारले -‘काका, काका, तुम्ही हे काय तयार करीत आहात?

“दोरी तयार करतो. दोरीने डोहाच्या सर्व किनाऱ्यांना बांधून घेईन. आणि तुम्हा सर्व भूतांना पाण्याच्या बाहेर काढेन.’ भूताचा मुलगा अगदी तत्परतेने पाण्यात शिरला आणि वृद्ध भूताला त्याने सांगितले- ‘बाबा, ये बाबा, ! मी आता वर गेलो होतो, किनाऱ्यावर तिथे एक माणूस दोरी तयार करीत होता. मी त्याला विचारले “तुम्ही काय करीत आहात?”, तेव्हा तो म्हणाला, “मी या दोरीने डोहाच्या घड्यांना बांधून ठेवणार आहे. कारण की तुम्हा सर्व भूतांना बाहेर काढावयाचे आहे.” वृद्ध भूत म्हणाले – “तू पुन्हा त्याच्याजवळ जा आणि विचार की त्याला शेवटी काय पाहिजे आहे?”

याच सुमारास नोकराने खड्डा खोदून त्यावर आपली टोपी ठेवली. तिच्या तळव्यास त्याने एक छिद्र केले होते.

भुताचा मुलगा बाहेर आला आणि त्याने विचारले -“तुम्हास काय पाहिजे?” ‘ही टोपी सोन्याने भरून दे!’ भूताचा मुलगा परत आपल्या बापाजवळ गेला व त्याने नोकराची गोष्ट सांगितली.

वृद्ध भूत म्हणाले – ‘ठीक आहे, पण त्याला सांग की, तुला लांब धावेमध्ये मला जिंकावे लागेल. भूताचा मुलगा नोकराजवळ आला. नोकराजवळ एक ससा होता. भूताच्या मुलाने त्यास शर्त सांगितली.

नोकर म्हणाला-“माझ्या सारख्याला तुझ्याबरोबर धावणे कसे काय बरे वाटेल. माझ्याजवळ एक छोटासा मुलगा आहे तोच तुला धावेत हरवून टाकेल.” भूताचा मुलगा आणि ससा धावू लागले. ससा एकामागून एक उड्या मारत दृष्टिआड झाला. भूताच्या मुलाला त्याच्या पावलांची चिन्हे देखील दिसली नाहीत. भुताचा मुलगा आपल्या बापाजवळ परत आला व म्हणाला ‘बाबा,त्याच्याजवळ एक बोटभर मुलगा आहे. तो माझ्याबरोबर धावला आणि मला मागे सोडून दृष्टिआड झाला.

वृद्ध भूताने त्याला पुन्हा परत पाठवून म्हटले की, “त्याच्याशी कुस्ती जिंकण्याची शर्त ठेव.’ भूताचा मुलगा परत नोकराजवळ आला व त्याने कुस्ती जिंकण्यासाठी शर्यत ठेवली. नोकर म्हणाला-“तू माझ्याबरोबर कुस्ती खेळू शकणार नाहीस.

प्रथम तू माझ्यासोबत असलेल्या या वृद्ध इसमाशी कुस्ती खेळ. तोच तुला चीत करेल.” नोकराने त्याला अस्वलाजवळ पाठविले.

अस्वल आणि भूताच्या मुलात कुस्ती झाली. अस्वलाने भूताला अशी बुक्की मारली की ते आकाशात उडून गेले. भूत भिवून आपल्या वृद्ध पित्याकडे गेले. वृद्ध भूताने त्याच्या हातात एक काठी देवून सांगितले, त्याला म्हणावे की, जा या काठीला हवेत जास्त उंच फेकेल तोच जिंकेल.

भूत, नोकराजवळ आले आणि त्याने आपली शर्त मांडली. नोकर म्हणाला, ‘ठीक आहे. प्रथम तू फेक.’ भूताने काठीला ढगांपर्यंत फेकले. नोकराची पाळी आली, तेव्हा त्याने भूताला म्हटले-‘तू आपले डोळे लावून घे. कारण की, तुला दिसणार नाही इतक्या उंच मी काठीला फेकणार आहे.’ भूताने आपले डोळे बंद केले आणि नोकराने काठीला झुडपांमध्ये फेकून दिले. जेव्हा भूताने डोळे उघडले तेव्हा नोकर म्हणाला- ‘पाहिले ! मी काठी इतक्या उंच फेकली की, ती दृष्टीने दिसूच शकत नाही.’ भूत परत आपल्या वृद्ध पित्याकडे गेले व त्याने आपल्या अपयशाचा सर्व वृत्तांत सांगितला.

आता त्यांच्यापुढे कोणताच मार्ग नव्हता आणि म्हणून ते टोपीत सोने भरू लागले. पण टोपी तर खड्डयावर ठेवली होती, आणि तिच्या मध्यभागी छिद्र केले होते. त्यामुळे खूप सोने टाकून देखील टोपी भरली नाही. शेवटी खड्डा जेव्हा सोन्याने भरला, तेव्हा नोकराने ‘पूर्ण करा’ असे म्हटले. त्याने सर्व सोने आपल्या गाडीत भरले, अस्वलास गाडीला बांधले आणि तो पोप महाराजांच्या घराकडे निघाला.

सोन्याने भरलेली गाडी पाहून पोप महाराज आश्चर्यचकित झाले. घरी आल्याबरोबरच नोकराने विचारले – ‘पोपजी! सोने आणले आहे” . आणि पोप म्हणाला-“अस्वलास माझ्या घोड्याशेजारी ठेव.” नोकराने तसेच केले. पण परिणाम उलट झाला. अस्वलाने घोड्याला खाऊन टाकले.

आता पोप महाराजांची छाती धड्धड् करू लागली. त्याला कळून आले की, आपण जाता या संकटातून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. त्याने पळून जाण्याचा पक्का विचार केला. आपल्या पत्नीच्या मदतीने त्याने डबल रोटीचे तुकडे वाळवून एका पिशवीत भरले. नोकर देखील मूर्ख नव्हता. त्याने पोप महाराजांची युक्ती ओळखून घेतली. त्याने त्या थैलीतून डबलरोटीचे तुकडे काढून घेतले व त्यात आपण स्वतः बसला.

रात्र होताच पोप आणि त्याची पत्नी घर सोडून पळत निघाले. जाता जाता दोघेही थकले. तेव्हा पोपानी म्हणाली-“थोडा वेळ आराम करू आणि डबलरोटी खाऊन घेऊ.” नोकर थैल्यांमधून बोलला. ‘हे पोपजी आणि पोपानीजी मी इथे आहे.’ त्यांना वाटले तो आमच्या मागे लागला आहे आणि म्हणून ते आणखी जोराने पळू लागले. पळता-पळता थकल्यानंतर त्यांनी पुन्हा आराम करण्याचे आणि पोटात काही तरी घालण्याचे ठरविले. पण नोकराने पुन्हा तोच आवाज लावला-‘हे पोपजी आणि पोपानीजी मी इकडे आहे. ते दोघेही पुन्हा धावू लागले. पण कुठपर्यंत धावतील? शेवटी थकून जाऊन एका ठिकाणी बसून जेवण करण्याचा त्यांनी विचार केला. ते थांबले व पिशवी उघडून पहातात तर तिथे त्यांना नोकर साहेब विराजमान दिसले.

नोकर बाहेर निघाला व म्हणाला- ‘बोला पोपजी, आता तुमच्या पाठीच्या पेटीएवढे चामडे काढून घेऊ आणि हातोड्याच्या वाराने डोके पिटून काढू काय?’ पोप महाराज हात जोडून क्षमा मागू लागले. नोकराने त्याला क्षमा केली आणि ते सर्व मिळून एका कुटुंबातील लोकांसारखे राहू लागले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..