नवीन लेखन...

ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम

आज २० ऑक्टोबर. ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम यांची पुण्यतिथी.

बाबा कदम यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंदराव कदम असे असले तरी ते आपल्या वाचक परिवारात `बाबा कदम’ म्हणूनच परिचित होते.

त्यांच्या कथा, कादंबर्या त मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास येणारच याचं आश्चर्य वाटत नाही. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. त्यामुळेच एक खानदानी आदब त्यांच्यामध्ये जाणवते अन् नकळत कुर्निसात करण्यासाठी हात पुढे होतो, मान अदबीनं झुकते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांची `अजिंक्यतारा’ कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचा मृत्यू झाला. प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती.

ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो.

१९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय’ याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन’ हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार’ हा चित्रपट निघाला. भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्याप त्यांनी लिहिल्या. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हात लिहिता राहिला. व्यक्तिचित्रण करणार्या् लेखमाला ही त्यांनी वृत्तपत्रातून चालविल्या. कोणत्याही वेळी, कुठेही असतांना माझ्याजवळ लिखाणाची वही जवळ असते. एकटाकी लिखाण करतो अगदी न्यायालयात एखादा तास मिळाला की, मी लिहित बसायचो, शेवट जास्तीत जास्त प्रभावी कसा होईल याबाबत मनात संघर्ष सुरु होतो. हातात एखादा घेतलेली कादंबरी संपल्याशिवाय खाली ठेवायला मला नको वाटते, असे ते सांगत. त्यामुळेच त्यांच्या कादंबर्यां च्या तीन-तीन प्रती सार्वजनिक ग्रंथालयात घेऊन देखील वाचकांची मागणी पुरविणे ग्रंथपालांना अशक्य होते.

विषयातही विविधता असल्याने कादंबर्या वाचकप्रिय झाल्या. सन्ना ही सिखसेकापू तरुणीवरील, अजिंक्य ही रेसवरील, राजधानी ही संस्थानिकांवरील `शोभा’ ही वेश्येवरील, वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील `निर्मला’ पद्मा चव्हाण यांच्यावरील `अभिनेत्री’ बापू बिरु वाटेगांवकरांच्या जीवनावर `दगा’ स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर `शाळा सुटली पाटी फुटली’ अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. लिहितांनाही त्यांनी आपल्या मनातला कलाकार जपला. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते म्हणत. नवरा-बायको ह्या पु.ल.देशपांडे यांच्या कथेवरील चित्रपटातही त्यांनी काम केलं.

बाबा कदम यांचे २० ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विजय बक्षी/.mymarathi.

(या लेखासाठी बाबा कदम यांचे छायाचित्र शोधण्यासाठी गुगलवर प्रयत्न केले. एकही छायाचित्र मिळाले नाही. सर्च रिझल्टमध्ये बाबा रामदेव यांची शेकड्यांनी छायाचित्रे दिसली.  विकिपिडियावर बाबा कदम यांच्याविषयीच्या पानावर केवळ एकच ओळ.. मराठी साहित्यिकांचे आणि मराठीचे दुर्दैव.. आणखी काय?)

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम

  1. बाबा कदम हे माझ्या अत्यंत आवडीचे लेखक होते
    त्यांच्या जवळपास सगळ्या कादंबर्‍या मी तीन ते चार वेळा वाचुन काढल्या आहेत. तरीही समाधान होत नाही
    आपण त्यांच्या दिलेली माहिती वाचुन आनंद झाला

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..