आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का?
ध्यानीमनी नसताना आपल्या जवळचा माणूस गमावणे किती भयानक आहे ते ज्यांनी गमावला आहे, इतरांना त्याचे काही नाही जोपर्यंत यमराजाने त्याच्या दारावर टकटक केले नाही. त्यात ओव्हर कॉन्फिडन्स असणारी माणसे, राजकारणी सर्वजण आले.
आजच मोहन भागवत यांनी सांगितले सरकारचे आणि लोकांचे थोडेसे दुर्लक्ष झाले . अहो थोडेसे नाही मृतांचा एकदा ३ लाखाच्या जवळ येतोय. अडीच लाख लाख मृत्यूहि थोडेसे म्हणण्या इतपत संख्या नाही. तर काहीजण म्हणतात अशी दृश्ये समाजमाध्यमांवर दाखवू नये , म्हणजे कोंबडे झाकले रहावे का ? आज काळ असा आहे तुमच्या प्रत्येक शब्दाची , हालचालींची समाजमाध्यम दखल घेते त्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा , शक्य होणार नाही. ते येणारच त्यासाठी तुमचे निर्णय पारखून घेणे आवश्यक आहे , अहंकाराने घेतलेले निर्णय किती घात करतात हे सर्वांच्या लक्षात आलेले आहे ….आणि हे सगळे भोग भोगता भोगता सामान्य माणूस बघत आहे , अनुभवत आहे तो विचार करून करून थकला आहे , तो विचाराने पॉझिटिव्ह कसा राहील .
भेटणे , बोलणे तुटले आहे. संभाषण हे एकमेकांत होते आणि ते किती महत्वाचे आहे हे आता कळत आहे. काहीजण कोरोनाचा विषय काढला की बोलणे थांबवतात , समोरचा माणूस तुमच्याशी मोकळे होण्यासाठी बोलत असतो , त्याला मोकळे होणे अत्यंत गरजेचे असते , तसे तुम्ही मोकळे होता. मी या कालखंडात अनेकांशी बोलत आहे , त्यांना थांबवत नाही. तो मोकळा होतो , मी पण होतो आणि नवीन अनुभव , वेदना समजतात. एक लिहणारा म्ह्णून मला नवीन विचार मिळतात , नवीन गोष्टी कळतात. हे एक प्रकारचे मानसपोचार तज्ञ पैसे घेऊन करतात आम्ही पैसे न घेता करतो. ह्या कालखंडानंतर खरी कॉन्सिलींगची , संभाषणाची गरज डॉक्टर्स आणि नर्स , वॊर्डबॉय याना आहे.अर्थात गल्लाभरू आणि स्वार्थी सोडून म्हणत आहे. आज त्या नर्सेस ना , वॊर्डबॉय याना महिन्याला किती रुपये मिळतात यांची साधी चौकशी कोणी कोविड सेंटर्स मध्ये केली आहे का , जरूर करा , ते कसे तुम्हाला कशी साथ देत आहेत ते बघा.ही तर सामान्य माणसे आहेत , त्यांच्याशी दोन मिनिटे आपुलकीने बोलून पहा. प्राण जाताना माणसाला काय वेदना होतात , तडफड होते याची आपल्या सामान्य माणसाला कल्पना नाही परंतु ते डॉक्टर्स , नस्रेस , वॊर्डबॉय बघत , अनुभवत आहेत. सर्वकाही असूनही ते काही काऊ शकत नाहीत.आज एकमकेकांशी बोलून जो अदृश्य स्ट्रेस निघून जातो , तो मनाचा निग्रह , मनाची समजूत वगैरे घालून जाणार नाही , माझ्या दृष्टीने हा पलायनवाद आहे पळपुटेपणा आहे.आज प्रत्येकाला फालतू आशावादी न रहाता अत्यंत प्रॅक्टिकल रहाणे गरजेचे आहे , संभाषण वाढवणे गरजेचे आहे तेव्हाच त्या स्ट्रेसचा निचरा होईल अन्यथा तो स्ट्रेस तुमच्या मनाच्या कोपऱ्यात दडून बसेल आणि पुढे निश्चित तुमचा घात करेल.
बघा पटते का ?
सतीश चाफेकर
Leave a Reply