नवीन लेखन...

कार्डाचे दिवस…..

हे पोस्टकार्ड पाहिलं की एकदम आजीची आठवण येते. ती खूप वाचायची पण लिहित मात्र नव्हती…का ते माहित नाही..पण पत्र लिहून देण्याचं काम आम्हा दोघी बहिणींचंअसायचं….पण ते आमच्याकडून कधीही अगदी सरळ नसायचं…आजीला खूप त्रास देऊन, उगीच छळून ,मगच लिहायचो आम्ही…मध्येच एकमेकींकडे बघत डोळे मिचकवायचे..काहीतरी खुणा करायच्या..उगीचच हसायचं, खिदळायचं….असं बरंच काही करायचो…..आजी थोडा वेळ ऐकून घ्यायची..,मग तिचा ठेवणीतला आवाज काढायची….त्यानंतर मग ते पत्र एकदाचं लिहिलं जायचं.
कधी कधी ती सांगेल तसंच मुद्दाम लिहायचो….त्यात बदल करुन लिहायचं असायचं..पण तसं न करता…तिची वाक्यं तश्शीच लिहायचो….आजीच्या नंतर ते लक्षात आलं होतं..मग ती वाचायला सांगायची..,आणि आमची लबाडी उघडकीस यायची…(आम्ही लिहिताना ती जसं बोलली तसंच लिहायचो…म्हणावं. असं करु नकोस,म्हणावं नीट वागत जा….वगैरेवगैरे…) पण वाचून दाखवताना आमचीच गल्लत व्हायची ..त्यामुळे आजीला ते कळायचं……
हे मी घरी माझ्या पतीला सांगितलं तेव्हां मला आठवतं, माझ्या पतीने मला सांगितलं ..आता तू ही लॅपटाॅप, कंप्युटर शिकून घे नाहीतर तुझीही अवस्था तुझ्या आजीसारखीच होईल., आपली कामं करुन देण्यास तरुण मुलांना विनंत्या कराव्या लागतील, आणि जाणवलं, खरंच की, आपली अवस्थाही आपल्या आजीसारखीच होईल तेव्हां शिकून घेणं अत्यंत आवश्यक आहे. माणसाला काळाप्रमाणे बदलावं, शिकावं लागतंच..
त्याशिवाय गत्यंतर नाही. हो, याची मजा वेगळीच ..आज शिकतिना तरुणांची खरोखरच खूप मदत होते. ही मजा वेगळी आहे आणि कार्डाची वेगळी.,
…असे ते कार्डाचे दिवस…
-–देवकी वालावदे

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..