नवीन लेखन...

बाटाटा

बटाटा हा भारतामध्ये कधीच नव्हता. बटाट्याचे पीक स्पेनमध्ये येत असे व त्याला बटाटा असे म्हणत असत. स्पेनवरून हे पीक ब्रिटनमध्ये अगदी पहिल्या प्रथमआले आणि मग ते बटाटा जगभर पसरला. साधारण १६व्या शतकात पोर्तुगालने बटाट्याला यांनी पहिल्या प्रथम भारतात आणले. बटाटा हे पीक दर वर्षी घेता येते. बटाट्याचे असंख्य प्रकार उदयास आले. हे पीक एवढे मोठे झाले की, चीनमध्ये बटाटा पहिला नंबर उत्पन्न मिळते आणि त्यात बटाट्याचा सिंहाचा वाटा आहे. सतराव्या शतकात म्हणजे १७७४ साली फ्रेंच वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आनटाईन पारमीयर यांनी बटाट्यावर संशोधन करून त्यात काय काय मिळते, याचा शोध लावला. त्यांनी म्हटले की, बटाट्यामध्ये खूप पोषक गोष्टी आहेत. हे कळल्यावर डॉ. आनटाईन यांनी बटाट्याची लागवड अगदी जोराने सुरू केली. तेव्हा त्यांना १८७५ साली ११७ मिलियन टन एवढे उत्पन्न मिळाले. हे पाहून बटाटे रशियानेसुद्धा लावण्यास सुरुवात केली. आणि पूरक अन्न म्हणून याचा उपयोग सर्वत्र होऊ लागला. अशा रीतीने बटाट्याचा खूपच प्रसार झाला आणि एक पूरक अन्न म्हणून याचा सर्वत्र बोलबाला झाला. तसेच बटाट्याचा उपयोग आशिया खंडात तसेच आफ्रिकेमध्येही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. चीन व भारतामध्येही बटाट्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. मात्र सर्वात जास्त कमाई केल्यामुळे भरपूर उत्पन्न आले. २००८ साली संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या अहवालमध्ये सांगितले की, आज घडीला अमेरिकेमध्ये ३१४ मेट्रिक टन एवढे बटाट्याचे उत्पन्न होते. वढेच नव्हे तर बटाटा हे अमेरिकेला सर्वात आवडते अन्न असे जाहीर केले. हा अहवाल पाहून चीननेही बटाट्याचे उत्पन्न वाढवावयास सुरुवात केली. त्यात चीनने सर्वात जास्त म्हणजे जगापेक्षाही अधिक उत्पन्न जाहीर केले आणि त्याबरोबर भारताने बटाट्याच्या उत्पादनाचा विक्रम रचला आणि भारताने चीनबरोबर बरोबरी केली. संयुक्त राष्ट्र संघाने हेही जाहीर केले की, संबंध जगामध्ये तांदूळ, गहू व मका पेक्षाही नगाचा एकंदर चौथा नंबर बटाट्याच्या बाबतीत लागतो. या बटाट्यात आहे तरी काय? भारतीय अन्न विभागाने आपल्या शास्त्रज्ञाने खूप संशोधन केले आणि त्याप्रमाणे भारतात बटाट्यामध्ये जीवनसत्त्व असतात तसेच खनिज द्रव्येही भरपूर असतात असे आढळले.

आपले हे पृथ्थकरण वापरले तर यात दोन प्रकार येतात. बटाटे कच्चे व बिन सालीचे व फक्त उकडलेले बटाटे. नवीन संशोधनात बटाट्याचा सालींमध्येही अनेक चांगले गुणधर्म असतात, असे आढळले. म्हणूनच बटाटे भाजी करताना ते सालासकट खाणे चांगले असते.

बटाट्याचा प्रसार सर्वत्र सुरू झाल्यामुळे त्यात अनंत प्रकार उदयास आले. सर्व जगामध्ये बटाट्याचे चीप्स करून ते तळून खाणे फारच लोकप्रिय आहे. भारतामध्ये बटाट्यात प्रचंड क्रांती झाली. आता प्रत्येकाच्या घरात बटाटा आढळतोच. अतिशय महत्त्वाचे समीकरण असते आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे बटाटा भारतामध्ये अगदी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत मिळतो. बटाट्याची भाजी, सामोसे, भजी, बटाटे वडा असे अनेक प्रकार इतर पदार्थ बरोबर खाता येतात. तसेच दक्षिणमध्ये मसाला डोसा, पराठा असे अन्य प्रकार करता येतात. अशा प्रकारे बटाटा हे एक अभूतपूर्व अन्न आहे, हे विशेष, १०० ग्रॅम बटाट्यात दोन्ही प्रकार येतात. एक म्हणजे साल नसलेले तर दुसरे म्हणजे सालासकट. हे गुणधर्म खालीलप्रमाणे

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..