नवीन लेखन...

पौरोहित्य – एक सामाजिक जबाबदादी

हिंदू समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. हर्शोल्हासित होऊन सण व्रत वैकल्ये आपल्या कुटुंबा सहित किंवा सांघिक शक्ती द्वारा साजरी करणे हा या समाजाचा मुख्य गाभा आहे. हि ब्रत वैकाल्ये जेव्हा आपल्या कुटुंबा बरोबर साजरी केली जातात तेव्हा हा वारसा नकळत पणे आपण आपल्या पुढच्या पिढीला देत असतो, आपसी बंध बळकट करत असतो, हा संस्काराचा आनंदाचा ठेवा कोणत्याही भौतिक सुखापेक्षाही मोठा आहे याचा आदर्श घालून देत असतो.

सांघिक पणे जेव्हा आपण हे सण साजरे करतो तेव्हा आपण सांघिक नेतृत्व उदयास आणत असतो, कोणत्याही सांधिक कामा मध्ये आपसी सौंहार्द टिकवून आपले काम वेळेत आणि अचूक पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे व त्यामधे नेतृत्वाची अहं भूमिका असते, नेत्रुत्व गुणांचा त्यामधे कसं लागतो आणि ते सोन्या प्रमाणे निखारून वर येते. हया सर्व उत्सवां मधून आपण एका सुदृढ आणि सक्षम समाजाचा पाया मजबूत करत असतो. ह्या सर्व व्रत बैकाल्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दूवा म्हणजे पौरोहित्य. आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आपण पहात आहोत आपल्या सर्व सणांच, ब्रत वैकल्यांच पुनरुत्थान होत आहे त्यांना सोनियाचे दिवस येत आहेत. आज गर्व से कहो हम हिन्दू है हे आपले ब्रीदवाक्य आपण खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात केली आहे. आज देशांतर्गतच नव्हे तर परदेशातही लोकांना हिन्दू धर्माप्रती विशेष आकर्षण निर्माण झाले आहे, त्यांचं कुतूहल चाळवल गेलं आहे. बरेच परदेशीही हिन्दू धर्म अंगिकारत आहेत, बरेचशे धर्म त्यागलेले बांधव हि उपरती होऊन घर वापसी करत आहेत. जशी जशी धर्मांची व्याप्ती वाढणारं, लोकांची रुची वाढणार, लोकांमध्ये जागृती होणार तस तसे त्या अनुषंगाने विवीध व्यवसाय आणि रोजगार ह्यामध्ये हि वृद्धी होणार. पौरोहित्य हा त्यामधील एक महत्त्वाचा व्यवसाय, दुर्दैवाने या व्यवसायाकडे तरुण पिढी फारशी आकर्षित होत नाही आणि ह्याच महत्त्वाचं कारण म्हणजे हया व्यवसायामधील अस्थीरता. आज आपल्याला पौरोहित्याकडे तरुणाईला व्यवसाय म्हणून आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. तरुणाईला जर पौरोहित्या कडे आकर्षित कराबयाचे असेल तर ह्या व्यवसायाला बर्‍यापैकी उत्पनां बरोबरच सामाजिक सुरक्षिततेची जोड देण्याची आवश्यकता आहे, त्यांच्या वैद्यकीय जरुरींची पुर्तता करण्याची आवश्यकता आहे. हया दोन्हीही गोष्टी आपण साध्य करू शकतो जर आपण पुरोहितांची मंदिरां बरोबर नोंदणी करु शकलो तर, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वैधकिय बीमा योजना तसेच आयुर्विम्याच संरक्षण मिळू शकते. विवीध बँकांकडून गृह कर्ज मिळू शकते ज्या योगे ते स्वतःच घराचं स्वप्न पूर्ण करु शकतात, डोक्‍यावर छप्पर असण्याच स्थैर्य मिळवू शकतात. अशा प्रकारच्या स्थैर्याची खात्री निर्माण झाली तर येणारी पिढी पौरोहित्याकडे व्यवसाय म्हणून आकर्षित होतील. ज्या हिन्दू बांधवांना आपल्या घरी किंवा अन्य ठिकाणी पूजा अर्चा करावयाची असेल त्यांनी प्रशिक्षीत पुरोहीतांसाठी मदिरांशी संपर्क करावा. मंदिरांनी पौरोहित्याचे दर विचार विनिमय करून ठरवावे, त्यामुळे आपल्या हिन्दू बांधबांनाहि प्रशिक्षीत पुरोहितांच्या सेवेचा लाभ घेता येईल. भारताची मंदिर अर्थव्यवस्था प्रचंड मोठी आहे, अनेक देशांचा जीडीपी यासमोर कमी आहे. पण हया सर्व गोष्टीं बरोबर आपली हिन्दू समाज म्हणून एक मोठी जबाबदारीहि आहे. सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया होण्यासाठी हया सर्व गोष्टी मध्ये शिस्तहि असली पाहिजे, लोकांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे. समाज कंटकांना ह्या पासून दूर ठेवता यायला पाहिजे आणि म्हणूनच पौरोहित्याचा सामाजीक दर्जा वाढवला गेला पाहिजे. हिन्दू समाज हा देवभोळा समाज आहे अशा भोळ्या भाबड्या समजाला कोणीही दावणीला बांधू नये ह्या साठी पौरोहित्याचा अभ्यासक्रम प्रमाणित करावयास हवा त्यामध्ये पारदर्शिता असावयास हवी, त्यासाठी एका नियामक मंडळाची स्थापना करावयास हबी ज्याद्वारे ह्या अभ्यासक्रमाचे व्यवस्थीत, शिस्तबद्धपणे नियमन आणि नियोजन व्हायला पाहिजे. प्रत्येक तालुक्‍यातील एका मोठ्या मंदिरामध्ये पोरोहित्याचा अभ्यासक्रम शिकवला जावा. प्रवेशाला शैक्षणिक अर्हतेचे निकष असावे, प्रवेश देण्यापूर्वी गुणवत्ता चाचणी घेण्यात यावी, अंतिम परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात यावी, परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे प्रमाणपत्रा सोबत रजिस्ट्रेशन केलें जावे अशा प्रकारें जर हया अभ्यास क्रमाच नियोजन केले तर पौरोहित्य शिक्षणाच्या दर्जाचा स्थर हि आपोआप वाढेल, त्याला एक प्रकारे सामजिक, वैश्विक मान्यता मिळेल ब आपण परदेशातही ह्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती करु शकू आणि आपल्या हिन्दू धर्माच्या शिकवणी द्वारा संपूर्ण विश्वात हर्शो उल्हासाच्या माध्यमातून सूख समाधान आणि आनंद पसरवू शकू.

— अरुणा सूद

मुंबई –  मो. 8879788106

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..