प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे ।।धृ।।
कांहीं काळासाठीं
नव्हता जगाचे पाठीं
कोठे तुम्हीं होता
न कळे आठवता
जाग येऊनी मिळाले भांडार आठवणींचे ।।१।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
विश्रांतीचा काळ हा
शांततेने गेला पहा
देह मनाची धावपळ
थांवली कांहीं काळ
पुनरपि लागते सर्वां चैतन्य जीवनाचे ।।२।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
गेल्या होत्या स्मृतिं
कांहीं काळांती
संपुन छोटे पर्व
परत लाभले सर्व
उपकार समजोनी याते आभार माना तिचे ।।३।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
सोडून देण्या दुःख
निद्रा मार्ग एक
नव्या जोमाने उठा
शोधा यशाच्या वाटा
हुरुप येण्या जीवनी आशिर्वाद मागा तिचे ।।४।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply