नाम घ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत
नामस्मरण , असू घ्या मुखांत …१
काय सांगावी, नामाची थोरवी
दगडही जेथे, तरंगून जाई…२
रोम रोमामध्यें, प्रभूचा संसार
बनून कवच, रक्षती शरिर…३
नामाची लयता, मन गुंतवून
एक होतां चित्त, जाई आनंदून…४
अंतीम ध्येय, ईश समर्पण
नामानी साधती, प्रभू सर्वजण…५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply