मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी
झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।
शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,
लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला तो मनी ।।
तूच दिसला नयनी, आई-बापा मांडी देऊनी,
माझे लक्ष तुझकडे, परि तू बघेना थोडे, ।।
आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,
तुझी शक्ति मला छळे, तें तुला कांहीं न कळे, ।।
थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,
तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।
टाकलेल्या विटेवरी, उभा राहिलो मी दूरी,
परि तू गेला निघूनी, मजला उभा करूनी ।।
होऊनी गेली अठ्ठावीस युगे,
आज देखील मी वाट बघे ।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply