एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांचीज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपतपडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणाराआपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे, या पेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे ? पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी ? काआपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी ? याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचारकेलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आजइतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो ? कोण आहोत ? याचे जरा सुध्दा भानराहिलेले नाही. हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे. तिच्या गौरवपुर्ण वारशाचा खुन आहे. हेआपल्याला लक्षात का बरे येत नाही. आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमानजागृत होत नाही.
युवास्सत: साधु युवाध्यापक: ।
आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥
उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा,शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावाकिंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकातआढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरतआहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळखबनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयीनजरेने पाहात आहे.
युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातीलसदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्गआपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे.त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणामआहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनचयुवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआपत्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षमबनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्तआध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारणशारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांनादूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल.
बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वचगोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, समाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभवाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्तआवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातीलमाणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो. याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभफक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्महेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्यालाध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते.आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचेम्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्तआध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोगनाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते.
म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा वपर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एकआदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भताआणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याचीक्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे.
परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे.जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शकच आपल्याआयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरूननंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांचीआणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांचीकाही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे. तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा,स्वामी, महाराजांपासून सावधान !