लयबद्ध चमचमाट अग्निशिखांचा।।
रात्रीच्या गर्भातला प्रकाशित फुलांचा।।
लोभसवाणी उतरली तारकादळे।।
सोहळा फुलविती अंधाऱ्या अवसेचा।।१।।
चंदेरी दुनिया लखलख तेजाची।।
भूवरी भंडारदऱ्यास शोभा स्वर्गाची।।
चला पाहूया मौज सरत्या वैशाखाची।।
ही विलोभनिय दृश्य प्रकाशफुलांची।।२।।
किर्र रात्री,धडपड निसर्ग प्रेमींची।।
इवल्या काजव्यांचे नर्तन बघण्याची।।
वाढताच संख्या अशा सोन किटकांची।।
सांगता मान्सून येताच मयसभेची।।३।।
— सौ.माणिक शुरजोशी
Leave a Reply