अंगणात सडा फुलांचा,
परी गंध तूझ्या देहाचा,
साम्य नाही दोहोंत मुळीच,
मला फक्त तू हवा-हवासा!
आसुसलेल्या नयन कडांवर,
भिरभिरे आता रंगीत वारा,
सप्तरंग आकाशी इंद्रधनुचा,
नभ धरी डोई वर्षाधारा !
चंद्रबिंब तुझ्यात भासे,
सूर्यकिरण उरात दाटे,
विरहाचे भोगले मी काटे,
संयोगाची ही वेळ वाटे !
बाहुपाशाचा वेढा तनुला,
नटखट सुटण्याचा माझा चाळा,
कुंतला मुक्त, बटा रुळती मुखावर,
जखडून ठेवती मज तूझ्या कलेवर!
– श्र्वेता संकपाळ