शोधावी आत्मसुखदा
लाभणे भाग्य भाळीचे
वर्तावे जगी वात्सल्ये
कुंभ भरावे सत्कर्माचे
जगी सर्वसुखी कोण ?
दुःख, हेच मनांतरीचे
देवांनाही नाही चुकले
भोग सारे पूर्वकर्माचे
मानवी, जन्म विवेकी
जाणुया अर्थ मानवतेचे
सुखदु:खांच्या झुल्यावरती
जगावे, संचित प्रारब्धाचे
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२१
३१/८/ २०२२
Leave a Reply