प्रश्न पडतात अनेक काही
त्याची उकल होतं नाही,
भाव साठतात हृदयात
त्याची उत्तरं मिळतं नाही..
सूर ताल लय चुकतात पण
शब्दांची मात्रा चुकतं नाही,
अर्थही बदलतात सारे कधी
पण भावनांची व्यथा कळतं नाही..
कवी कल्पनेत रंगवतो सदा
दुनिया खरी आणि खोटी,
शब्दही कवीचे मिटतात मग
स्वार्थाची दुनिया पाहून खरी..
भाव विश्व सारे उभारतो
कवी काव्यांतून नेहमी,
शब्द असतात सोबती सारे
म्हणूनच जन्मतो कवी हजारातुनी..
प्रश्नांना प्रश्न पडावे असे
प्रसंग येतात आयुष्यात कधी,
उत्तर न शोधावे तेव्हा कुठले
भाव शोधावा अंतर मनातुनी..
मोरपीसी रंग न्यारा असा
आयुष्यात माणस भेटावी अशी,
पिसासारखे मन हलके करावे
प्रश्न न पडतील कुठले तेव्हा कधी..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply