माझ्या मते वाया गेले आयुष्य माझे
तुझ्या मते शुल्लक होते प्रश्न सारे !!
बोलण्यासाठी शब्द कुठे शिल्लक होते ?
शब्दांसाठी शब्द हे, शब्दांचे खेळ सारे !!
नको विचारू उत्तर, जीवघेण्या प्रश्नांचे
प्रश्नांने उपजती प्रश्न, राहूदे ते प्रश्न सारे !!
जगण्याचा बहाणा तुझा की माझा खरा
आज माझी परीक्षा तूच ओळखून घे सारे !!
कुठे नेऊ कसे नेऊ माझे मला कळेना
आपोआप येती, श्वास हे निर्लज्ज सारे !!
धूर वाटे ओळखीचा आपुल्याच जळण्याचा
राख वाटे आपुलीशी, जुळती निसर्गाशी सारे !!
— विश्वनाथ शिरढोणकर
इंदूर, म.प्र.
Leave a Reply