मल्याळम चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एम के अर्जुनन यांचा जन्म दि. १ मार्च १९३६ रोजी झाला.
संगीतावरील प्रेमामुळे एम. के. अर्जुनन यांना अर्जुनन मास्टर म्हणूनही संबोधलं जात असे. १९६८ साली त्यांनी ‘कृतापौर्णमी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २०० चित्रपटांमधील ७०० हून अधिक गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केली होती. ए. आर. रेहमान यांना १९८१ मध्ये अर्जुनन यांनी कामाची पहिली संधी दिली होती. त्यांच्या नावावर अनेक एव्हरग्रीन गाणी आहेत. चित्रपटांसोबतच त्यांनी नाटकांनाही संगीत दिलं. जवळपास ३०० नाटकांमधील ७५० गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केले होते. ए.आर.रेहमान यांना १९८१ मध्ये अर्जुनन यांनी पहिली संधी दिली होती.
एम.के.अर्जुनन यांचे ६ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply