आता जगणे अंगवळणी पडले
जगी मी डोळे झाकुनी चालतो
टाळुनीयाच वेडीवाकडी वळणे
सन्मार्गावरी, सावरूनी चालतो
शब्दाशब्दांचे अर्थ सहज जाणतो
जर दिला शब्द कुणा तो पाळतो
ऋतुऋतूंचा, जरी असे बेभरोसा
कालचक्र भाळीचे, निमूट झेलतो
जरी उध्वस्त स्वप्ने सारी अंतरीची
गुच्छ आशांचे मी हळुवार गुंफीतो
हृदयांतरी सुगंधाच्याच अत्तरकुपी
माझ्याच भावगीतातुनी मी हुंगतो
लोचनी सांजळलेली तिन्हीसांजा
त्या सोज्वळ निरांजनी मी नाहतो
अंतरात नित्य प्रतीक्षा आकांक्षांची
बाहू पसरूनी मुक्तीची वाट पाहतो
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १३५
१५ – १० – २०२१.
Leave a Reply