नवीन लेखन...

प्रवास

रविवारी सकाळी उठता उठताच तो तिला म्हणाला, “थोडं भराभर आवरून घेतो, एकाला भेटायला जायचंय.” त्याचा एक जवळचा, नी जूना colleague आहे, लिंगा नावाचा. त्याचे वडील वारलेले ४ दिवसांपूर्वी. आज सुट्टी आहे तर भेटता येईल. काही वर्षांपूर्वी एकदा mild attack आलेला त्यांना, त्यामुळे हे तसं अनापेक्षितच होतं! त्याचे स्वतःचे वडीलही नुकतेच घरी राहून गेलेले, त्यामुळे तोही जरा emotional झालेला.

पण तेवढ्यात तिने आठवण करून दिली, की संध्याकाळी त्याच्या दुसऱ्या एका colleagueच्या मुलाची 1st birthday पार्टी आहे! हा colleague सुद्धा जवळचाच आहे. Team मध्ये इतरांपेक्षा खरं तर त्याचं ह्याच्याशी जास्त पटतं.

अरे बापरे! म्हणजे birthday आणी death बद्दलची visit एकाच दिवशी करायची!? म्हणजे “आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत” आणी “आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोत” हे दोन्ही तेवढ्याच आत्मीयतेने दोघांना सांगायचं!?

बरेच जण मयतांच्या घरी अगदी जायचं असतं, म्हणूनच जाऊन येतात, नी birthdays सारखे सोहळे चुकवूच कसं? म्हणूनही जातात.

पण तो त्यांतला नाहीये. फारशी माणसं जोडायला बघत नाही, पण जोडलेल्यांचं प्रत्येक सुख दुःख आपलं मानतो.

Self drive करत तो निघाला तर खरा, पण मन दोन्ही प्रसंगांची तुलना थांबवत नव्हतं.. एका जन्माचा सोहळा तर एका मरणाप्रित्यर्थ शोकांतिका. दोन्ही ठळक चेहेरे जीवनाचेच, पण एक म्हणे प्रवासाची सुरुवात, तर एक संपल्याचा आभास! एकीकडे गेलेल्यांच्या विरहाने कष्टी होतील तर दुसरीकडे नावागताला घरात/कुटुंबात/समाजात सामावून घेण्यासाठीच्या प्रयत्नांत असतील! दोन्ही अतीव! दोन्ही अगतिक, दोन्ही आभास!..?

विचार संपले नाहीत, पण प्रवास संपला. तो लिंगाच्या घरी पोचला. आत फारसे कुणी नव्हते. त्याची आई, बहीण, नी भाचा, एक शेजारचे कुणीतरी.. प्रत्येक जण काही ना काही उद्योगात होता. तो लिंगाच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसला. कसं काय वगैरे विचारलं, तेवढ्यात रडत ओरडत लिंगाचा भाचा बाहेर आला. त्याला जेवायचं नव्हतं, आणी आई भरवल्याशिवाय सोडणार नव्हती. ते पाहून लिंगा उठला, नी त्याच्या भाच्याचं आवडतं गाणं त्याला त्याच्या खेळण्यातल्या keyboardवर वाजवून दाखवू लागला. बहिणीनेही संधी साधली, नी ती मुलाला घास भरवू लागली. हे सगळं पाहता पाहता तो काही क्षणांसाठी तिथे कशासाठी गेलेला तेच विसरून गेला!

ह्या प्रवासाची अखंडता हेच तर ह्यातलं गमक आहे! कोणी कधीही, कुठेही, कसाही असो, पुढे जात राहणे, या पेक्षा काहीही कुणाकडूनच अपेक्षित नाही! नाही का?

तो लिंगाच्या घरून निघाला, निवांत मनाने काही वेळापूर्वी ऐकलेलं गाणं गुणगुणत drive करू लागला…happy birthday to you.. happy birthday to you.. happy birthday dear baby.. happy birthday to you..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..