नवीन लेखन...

प्रवास आयुष्याचा

एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो. त्यातून बरेच काही शिकता येईल. ते मनोगत असे …….

माझे आयुष्य कसे गेले,
हेच कधी उमजले नाही l
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ll
लहानपणी जमवायचो,
सोबतीला सारे सवंगडी l
विटीदांडू, आबाधुबी अन्,
चेंडूफली कधी लंगडी ll
खेळतांना मात्र स्वतःचा,
कधी विजय पाहिला नाही ll१ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही……
तारुण्यातही मित्रांसाठी,
केल्या ब-याच भानगडी l
नको नको झंझटांमूळे,
विस्कटली जीवनाची घडी ll
दुस-यांसाठी केली लफडी,
स्वतःसाठी एकही नाही ll२ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ……
मग घेतला झेंडा खांद्यावर,
बनलो पक्षाचा कार्यकर्ता,
तेथे माझा उपयोग केला,
फक्त निवडणूकी पूरता ll
आंदोलनाच्या केसेस् मात्र,
अजूनही मिटल्या नाही ll३ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
झाले लग्न माझे अन्,
थाटला नवा संसार l
तेव्हापासून लागला मागे,
आणा-आणीचा बाजार ll
अपार कष्ट करुन सुध्दा,
संसार पुरा झाला नाही ll४ll

कुणासाठी जीवन जागलो,
हेच मला समजले नाही…….
मुले शिकून मोठी झाली,
अन् लागली कमवायला l
मुलगी गेली जावायासोबत,
मुलगा सुनेबरोबर गेला ll
आम्हा म्हाताऱ्यांसोबत,
कुणीही राहिला नाही ll५ll.

कुणासाठी जिवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
वयानुसार शरीर थकले,
आता जडले अनेक आजार l
आम्ही म्हातारा म्हातारी,
परस्परांना देतो आधार ll६ll

आता समजलेही सारे,
पण आयुष्य उरले नाही……
आयुष्याच्या या प्रवासात,
गरज आहे सद्गूरुंची l
तेच देतात गुरुकिल्ली,
भगवंताला जाणण्याची ll
भगवत्भक्तिच्या मार्गावर,
सद्गुरुशिवाय पर्याय नाही ll७ll

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही………

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

9 Comments on प्रवास आयुष्याचा

  1. तूच तुझी वैरी ही कविता बहिणाबाई चौधरी यांची नसून देवानंद जंजाळ अकोला यांची आहे काही शंका असेल तर 8805601011 या नंबर वर फोन करावा. ही कविता अहिराणी भाषेत नसून ती वऱ्हाडी भाषेत आहे.

    • देवानंद जंजाळ यांचा फोन नंबर 9764424864

  2. ही कविता बहिणाबाई चौधरी यांची नाही
    ही कविता अकोल्याचे कवी देवानंद जंजाळ यांची आहे

  3. ही कविता बहिणाबाई चौधरी यांची असून श्री देवानंद जंजाळ, अकोला यांची आहे. काही शंका असल्यास
    मो – 9764424864 या नंबरवर कॉल करून खात्री करू शकता
    ही कविता अहिराणी भाषेतील नसून विदर्भात बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी भाषेतील आहे

  4. हि कविता अकोल्याचे कवी श्री.देवानंद जवंजाळ यांची आहे .

  5. ही कविता बहिणाबाई चौधरी यांची नाही … अशी कविता त्याच्या नावाने पोस्ट करणं ही खुप निंदनीय बाब आहे

  6. तूच तुझी वैरी is really nice poem. One doubt though, is it really penned by Bahinabai? I am not sure whether ST was that prevalent in that era.

    • Agree …….. अशी कविता बहिणाबाईंच्या नावाने फिरणे ही खुप निंदनीय बाब आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..