शब्दसागर! दान सरस्वतीचे
उमलते निष्पाप हृदयांतरात
आभाळ! सारे प्रीतभावनांचे
विरघळे, अलवार भावप्रीतीत
मनगर्भी! काहूर, संवेदनांचे
मी शोधतो, सुगंधा स्पंदनात
माळीता, हृद्य क्षणाक्षणांना
मंत्रमुग्ध! प्रीतभाव अंतरात
तव स्मरणी, भावस्पर्श रेशमी
गात्रागात्रातुनी, ओसंडते प्रीत
गगनी मी भुलावे अन तू लपावे
खेळ, आगळा चालला अविरत
तो मोगरा, गुलाब, बकुळ, चाफा
दरवळतो धुंद अजुनही अंतरात
भावप्रीतिच्याच, महाकाय लाटा
गुंफितो मी अलवार भावशब्दात
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४७.
१० – १२ – २०२१.
Leave a Reply