मध्ये एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे तिची सुखदुःखे जाणून घेतली. तिचा नवरा बराच आजारी होता. ती मानसिक दृष्टीने खचली होती. परंतु त्यावेळची तिची मानसिक अवस्था पाहून,– आज आठवून मी खालील कविता केली आहे,—
मी आहे बघ जवळी,
रात्र घनतम काळी,
किती सोसशी वेदना,
प्रीतीची फुंकर निराळी,–!!!
असह्य होता तुझा,
जीव किती कळकळे,
काळजात थेट उठे,
कळ माझ्या सख्या रे, –!!!
कधी होशील ठीक ,
जीव सारखा तळमळे,
संसार आपुला अर्ध्यावर,
तुझ्यावाचून, कसा होईल रे,–!!!
धडकी भरे उरात माझ्या, कल्पनेतही नको हे सारे,–
भोगांची परिसीमा गाठता,
आत तरी किती तुटते रे,–!!!
जन्मोजन्मी साथ आपली,
केव्हा हे सारे सरणार रे ,
पती-पत्नी एकच असती,
देह फक्त ना दोन रे,–!!!
किती एकजीव आपण,
कुणाला सांगू जावे रे ,
जगाला हे कळत नसते,
ही अद्वैताची गुंफण रे,–!!!
प्रेमपाखरू कसे रडते,
तुला पाहून काळीज हलते,
स्वतःस किती दिलासा देऊ,
कसा ठेवावा धीर रे,–!!!
पती स्त्रीचे जग असते,
कोणाला कळेल हे बरे,
पाहून तुझे तडफडणे,
आतून मी उद्ध्वस्त रे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply