सखे कसे सांगू शल्य अंतरीचे
श्वास तुजसाठी व्याकुळ आहे
नित्य आलिंगीतो तुला अंतरात
मन हळवे तुजसाठी झाले आहे
तुझ्या आठवांचे ओघळ लोचनी
सभोवती तुझाच सारा भास आहे
विरहात तव अस्तित्वाची सुखदा
मी ,आजही मौनात भोगतो आहे
स्मरती बकुळफुलांच्या ओंजळी
तव स्पर्शाठवात मी गंधतो आहे
प्रारब्ध ! भोगले दैवयोग समजूनी
सांजवेदीवरी दर्शनाची आंस आहे
आज याविण दूजी नाहीच याचना.
प्रीतज्योत ! अजूनही तेवतेच आहे
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१४४
१८ – ११ – २०२१.
Leave a Reply