नवीन लेखन...

प्रीतीतील पावित्र्य

मित्रहो,
प्रीती ही अंतरिक निर्मोही आणि पावित्र्य असलेली अशी दैवी संवेदना आहे! ती स्पंदनांशी निगडित आहे! एक अनामिक! अनाहत! अविरत! चिरंजीवी असा ध्यास, भास, ओढ आहे!! की जी तनमनहृदयाच्या धमन्यातून, रंध्रारंध्रातुन श्रीकृष्णाच्या मंजुळ बासुरी प्रमाणे मधुरतम नादत असते .!! जीवनाला मंत्रमुग्ध करीत असते. ती प्रचिती म्हणजेच प्रीती असते.!!
प्रीती म्हणजे मानवी सात्विक प्रवृत्ती व प्रकृतीचा तो स्थायीभाव आहे हे निर्विवाद.!
प्राचीन हिंदूसंस्कृती, धर्मग्रंथामध्ये मीरा, राधा, कृष्ण यांचे यांच्या उत्कट सात्विक, सोज्वळ, निरागस भक्तीप्रीतीचे खुपच सुंदर वर्णन केलेले आहे.
हे प्रीतिच नातं! मुळातच, शुभंकर! कल्याणकारी! सांत्वनी! निर्मल! निर्मोही! आत्मशांती सुखदा असते.! तृप्तकृतार्थता असते! जिथे फक्त फक्त निर्व्याजी प्रीतभावनां असते.
मनहृदयातील या नात्यांना विविध भावनिक भावशब्दांची शब्दालंकारीत सुंदर, निष्पाप गंधफुलं येत असतात . त्यांना स्थल, काल, रूप यांची कधीच तमा नसते . कारण त्या निरपेक्षित शब्दमनभावनांच्या अलगद, अलवार अशा उमलण्याला तृप्त समर्पित सुंदरतेची रेशमी झालर असते. जशी क्षितिजावरची गुलमुसलेली सुरम्य नयनमनोहर अशी सप्तरंगली सांजसंध्या असते.
त्या दैवी प्रितीतून, सोज्वळतेच्या परिपूर्णतेनं ओसंडलेली सर्वच निष्पाप नाती उमललेली असतात . सारे कुटुंब आजी, आजोबा, माता, पिता, काका,काकू, आत्या, बंधु,भगिनी, पत्नी, मुले, मूली, नातवंडे, जीवापाड मित्र, मैत्रीणी, प्रेयसी अशा या विलक्षण निर्मळ नात्यातील विलोभनिय असे अंतरातील मृदुल काळजाचे ठाव घेणारे मयूरपीसी स्पर्शक्षण हे अविस्मरणीय असतात.
असं लोचनांना सात्विकतेन तृप्त मनांन प्रितीत विर्घळून जाणारं स्वर्गसुख लाभलं नां! की खरच अजून किती किती जगावं असं अगदी मनापासून वाटू लागतं!
प्रेमाला कधीच वयाचं आणि नात्यांचं बंधन नसतं . ते उत्स्फूर्त असतं . माणसं एकमेकांच्या सहवासासाठी मैत्रीसाठी नेहमीच आतुर असतात.
अन मग अशा नात्यांतील अतूट भावबंधांची घट्टदाट वीण म्हणजे स्वान्तःसुखाय! स्वर्गसुखदाच असते.
जीवनात भौतिक सुखाची भली मोट्ठी छत्रचामरे जरी श्रृंगारली असली तरी या अशा निर्मळ प्रितिच्या नात्यांच मोजमाप हे ब्रह्मांडातील कुठल्याच मोजमाप दंडांनी मोजता येत नसतं! हे मात्र त्रिवार सत्य आहे. हा माझा वैयक्तिक विचार आहे.
मूक मनांचे संवाद हे अंतरात सदैव पाझरत असतात .त्या निर्मळ पाझरांची मंद झुळझुळणारी अशी परस्पर हॄदयांतील त्यागाधिष्टीत, सपमर्पित असे अवीट नादमाधुर्य भावगंधल्या सात्विक प्रीतीची जाणीव करुन देतात. अशी प्रीत म्हणजे न बोलता देखील जाणवणारी आणि मनमौनाचे अंतरंग सहज उमजणारी सत्यता असते.!
हे वास्तव फक्त जाणले पाहीजे . मग त्यातूनच सुंदर अभिजात नवरसरंगी भावनोत्कट काव्यरचना जन्मते.
प्रीती हा साहित्य /काव्यक्षेत्रात लिलया वावरणाऱ्या बहुअंशी कविवरांचा, लेखकांचा आवडता विषय आहे असं मला वाटतं.
इती लेखन सीमा.
विगसा
(१२ – मार्च – २०२२)

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..