आपण आपल्या मनाची चाचपणी घ्या. मन नेहमी नकारात्मक गोष्टीन्कडे झुकत असते असे दिसून येते. ते नेहमी भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये झोके घेत असते. ज्यावेळेस ते भूतकाळात जाते, त्यावेळेस भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीन्बद्दल ते राग राग करते. परंतु राग हा निरर्थक असतो. कारण तो केल्याने आपण आपला भूतकाळ काही बदलू शकत नाही. आणि मन जेव्हा भविष्यकाळात डोकावते, त्यावेळेस ते भविष्यकाळात घडून येणा-या किंवा न घडून येणा-या गोष्टीन्बद्दल उत्सुक असते. परंतु आपण ज्यावेळेस वर्तमानकाळात असतो व पाठीमागे वळून भूतकाळात पाहू लागतो, त्यावेळेस आपला राग आणि उत्सुकता ही निरर्थक असल्याचे जाणवते. म्हणून राग आणि उत्सुकता ज्यावेळेस आपण आपल्या मनातून काढून टाकू, त्यावेळेस आपले मन स्वच्छ होवून ते आनंदी होईल, ते प्रेमाने ओथंबून वाहील.
प्रेम हे काही कार्य नव्हे; तर ती एक अवस्था आहे. आपण सगळे प्रेमाचे भुकेले आहोत. प्रेमाने तयार झालेले आहोत. वर्तमानात जर का आपले मन असेल, तरच ते प्रेमात असेल. मुलांकडे पहा ! ती आकर्षक असतात. का? तर ती वर्तमानात असतात. आपल्या आयुष्यात काय घडले की त्यामुळे आपण बुद्धिवादी आणि हुशार झालो? परंतु त्याचवेळेला आपण आपला भोळेपणा/भाबडेपणा गमावला. सुसंस्कृपणा आपला भोळेपणा/भाबडेपणा राखतो आणि तो बुद्धिमानतेबरोबर वाढत जातो. सगळ्यात महत्वाचे समीकरण म्हणजे बुद्धिवान होणे व त्याचवेळेला आपला भोळेपणा किंवा भाबडेपणा जोपासणे होय.
मन नेहमी शंकाकुल असते, ते ह्यासाठी की सकारात्मक काय आहे? आपणाला आपल्यातील आनंदीवृत्तीची, आनंदाची आणि आपल्यातील चांगल्या गुणांची देखील शंका येत असते. परंतु आपण ज्यावेळेस खचलेले असतो किंवा रागावलेले असतो, त्याची मात्र शंका नसते. शंकेला जीवनात थारा नसावा. आपल्यातील नकारात्मक दृष्टीकोनाबद्दल आपण शंका घ्या. आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल विचार करा. त्यानंतरच आपल्यातील विश्वास नैसर्गिकरित्या वाढू लागेल. विश्वास म्हणजेच भोळेपणा/भाबडेपणा.
ज्यावेळेस स्वत:जवळ विश्वास असेल, त्यावेळेसच आपण भितीमुक्त होवु.
म्हणून कोणीतरी म्हटले आहे – कर्तृत्वानेच मिळव यश ………………….
विश्वासान जीवनात कर यशाला वश …………
पक्का ठेव तू तुझ्या मनाचा विश्वास
फक्त विजयाचा मनात धर तू ध्यास ……………..!!!
स्वैर अनुवाद श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनांतून …….
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply