मागून जे मिळतं ते कवडीमोल ठरतं,
अमूल्य असूनही, भावनांच्या कचाट्यात पडतं,
थोडं झुलतं – थोडं डुलतं, थोड रडून पुन्हा हासतं,
तरी मनाच्या हिंदोळ्यावर , निवांत बहरत असतं,
प्रेम अर्ध्या वाटेवरचं, काट्यासारखं रुतून बसतं,
कारण मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…!
मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…!
– श्वेता संकपाळ