तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं
अपेक्षा करता तुम्हीं प्रेमाची, सदैव इतरांकडूनी…१,
सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या तुमच्या जीवनीं
क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी…२,
प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला
प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३,
याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे
दोन मनें ती सांधली जावूनी, आनंद सर्वत्र दिसत असे…४,
राग लोभ हे शत्रू आपले, घालवूनी घ्यावे तुम्ही त्यांना
प्रेम नाण्याची मदत घेता, सहज जमेल हे सर्वांना…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply