वय होतं ते अल्लड
आणि मन होतं कोवळं
चंचल स्वभाव तिचा
पण ह्रुदय होतं सोवळं
अगदी उगाच सहज
ती बघुन हसली होती
त्याच्या खोट्या शपथेला
पूरती फसली होती
निरागस तिला
निर्मळ प्रेमाची तहान होती
त्याची प्रेमाची भाषा
अगदीच वेगळी होती
त्याचा तो स्पर्श
हीन हिस्त्र वाटला तिला
तिच्यातल्या स्त्रीनं
तत्पर तो ओळखला
नाजूक एकांतात तिनं
स्वतःला सावरल होतं
अवघड क्षणाला
संयमानं जिंकल होतं
संबंध त्याच्याशी
कायमचे तिने तोडले
वाईट स्वप्न समजून
पानच ते फाडले
स्पर्शाच्या जाणीवा
धूतल्या तिने आसवांनं
चुरगळलेल्या मनाला
सावरलं अलगद धीरानं
बोहल्यावर चढण्यापूर्वी
सावध ती झाली
सितेची अग्नीपरिक्षा तिला
द्यावी नाही लागली
सुंदर नविन जिवनात
अगदी आनंदाने रमली
अन् प्रेमाच्या चकव्याला
पून्हा कधी नाही भूलली…
– डॉ. सुभाष कटकदौंड