प्रतिभाच्या रुपात नीलम आणि सोनलला एक चांगली मैत्रीण भेटली होती त्यांना त्यांचं मन मोकळं करायला. नीलम आणि सोनल निघून गेल्यावर प्रतिभा स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना दारावरची बेल वाजली आणि ती हातातील पाण्याचा लोटा हातात घेऊनच दरवाजा उघडायला बाहेर आली असता दरात त्या लोट्यातील पाणी सांडले. प्रतिभाने दार उघडला तर दरात विजय होता. दार उघडून प्रतिभा माघारी जाताना त्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि ते पाहून विजयने तिला आपल्या मिठीत सावरले नेमकी तेव्हाच कविता तेथे आली आणि अर्धवट उघडया दरवाज्यातून तिने हे दृश्य पाहिले आणि तिचा भंयकर मोठा गैरसमज झाला ती काही न बोलताच तेथून माघारी फिरली. त्यांनतर विजयने सहज गडबडीत असल्यामुळे चार- पाच दिवस कविताला फोन केला नाही पण यादरम्यान तो प्रतिभासोबत बाजारात खरेदी करताना मात्र तिला दिसला त्यामुळे तिचा संशय अधिक बळावला. कविता आता हे आठवू लागली की पूर्वी विजय जेंव्हा जेंव्हा गावावरून यायचा तेंव्हा तो प्रतिभाची भरभरून स्तुती करायचा, प्रतिभाने असं केलं, प्रतिभाने तसं केलं, प्रतिभा बरोबर इकडे फिरलो तिकडे फिरलो, तिकडे असं झालं वगैरे, त्याला प्रतिभासोबत लग्न करायचे नव्हते पण संबंध मात्र ठेवायचे होते म्हणून त्याने प्रतिभा आणि अजयच्या लग्नात पुढाकार घेतला. मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा प्रतिभाचा चेहरा कसा बदलला होता. पूजेला आले तेंव्हाही प्रतिभा विजयच्या शेजारी बसली होती. तिच्यासोबत इतक्या गप्पा मारत होता जणू काही मी तिथे नव्हतेच! गावी मला तेंव्हा मी म्हणाले माझ्यासोबत चल तर नाही म्हणाला, मी अजून चार पाच दिवस राहीन म्हणाला पण माझ्या मागून लगेच दुसऱ्या दिवशी आला पण दोन – चार मला भेटला नाही. तशी ती प्रतिभा दिसायला माझ्यापेक्षा सुंदर नसली तरी कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडावा इतकी सुंदर ती नक्कीच आहे. या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा म्हणून कविताने विजयला भेटायला बोलावले आणि तो काही बोलण्यापूर्वीच ती भडाभडा ओखली त्यावर रागाने विजयने तिच्या श्रीमुखात लगावली आणि निघून गेला. पण झाल्या प्रकाराबद्दल विजयने प्रतिभाला काहीच सांगितले नाही. प्रतिभाने विजय जवळ त्याच्या आणि कवितांच्या लग्नाचा विषय काढताच त्याने तिला टाळलं! हे लक्षात येऊन प्रतिभाची खात्री पटली कि नक्कीच विजय आणि कविता मध्ये भांडण झालं आहे. प्रतिभाने परस्पर फोन करून कविताला भेटायला बोलावलं, कविताही भेटायला आली तर प्रतिभाला लंगडत चालताना पाहून कविता म्हणाली, “ताई लंगडतेस का?” त्यावर प्रतिभा म्हणाली, “आठवडा झाला लंगडतेय! त्यादिवशी स्वयंपाक करत होते विजय आला म्हणून दरवाजा उघडायला धावले तर हातातील लोट्यातील पाणी दरात पडले माघारी फिरताना पाय घसरला आणि मी पडले काही मिनिटे तर मी बेशुद्धच झाले भानावर आले तेव्हा कळले की विजयने त्याच्या मिठीत मला सावरले होते पण पाय मुरगळायचा तो मुरगळलाच!”
हे सारं ऐकल्यावर आपण किती मोठी चूक करून बसलोय हे कविताच्या लक्षात आले तिला तर राडावेसे वाटत होते पण तिने सावरले स्वतःला. प्रतिभाने तिला विचारले, “विजय आणि तुझ्यात काही बिनसलं आहे का?” त्यावर कविता “नाही तर! तो काही म्हणाला का?” त्यावर प्रतिभा म्हणाली, “तसं नाही तुमच्या लग्नाचा विषय काढला की तो टाळाटाळ करतो म्हणून!!” त्यावर कविता मन खाली घालून म्हणाली, “हो! आमच्या थोडं वाजलं होत पण आता ठीक आहे मी माफी मागेन त्याची चुकी माझीच होती हवे तर मी त्याच्यासमोर कान पकडेन!”
इतक्यात दारावरची बेल वाजली कवितेने पुढे होत दार उघडले तर दरात विजय होता. विजयला पाहून प्रतिभा स्वयंपाक घरात गेली पण कविताला अश्रू अनावर होत ते तिच्या गुलाबी गालावरून खाली टप तटप गळू लागले, कविता तिचे दोन्ही कान हाताने पकडून त्याला सॉरी म्हणाली असता, विजयने काही न बोलता तिला आपल्या मिठीत घेऊन शांत केले आणि म्हणाला, “माझेही चुकलेच मी तुझ्यावर हात उचलायला नको होता, तू जे पाहिलेस ते पाहिल्यास कोणाचाही गैरसमज होऊ शकतो हे मला लक्षात यायला हवं होत. जेथे प्रेम असतं तेथे संशही असतोस!”
इतक्यात प्रतिभा चहा नाश्ता घेऊन येताच दिघेही सावरले. कविता निघून गेल्यावर प्रतिभा विजयला म्हणाली, “आज तुमचे आई बाबा गाववरून येणार आहेत मग तुझ्या आणि कविताच्या लग्नाचं ठरवून टाकू!” त्यावर विजयने मानेनेच होकार दिला आणि तो बाहेर निघून गेला. थोड्यावेळाने अजय घरी आला तो तयार होऊन बाहेर पेपर वाचत बसला आणि प्रतिभा आतल्या खोलीत होती इतक्यात दारावरची बेल वाजली, दरात प्रेरणा उभी होती तिला आत घेत प्रतिभाला हाक मारत अजय म्हणाला, “प्रतिभा! बाहेर ये! आमची मेहुणी आलेय भेटायला” ते ऐकून प्रतिभा लगबगीने बाहेर आली आणि तिला मिठीत घेतले आणि म्हणाली, “आज अचानक कशी काय आलीस?” त्यावर सोफ्यावर बसत प्रेरणा म्हणाली, “मी माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचे पास घेऊन आलेय तुमच्यासाठी! निलेशनेही दिले असते पण हे माझे स्वप्न होते म्हणून मी आले.” “आता जेवूनच जा!”
प्रतिभा म्हणते न म्हणते तो प्रेरणा त्यांचा निरोप घेऊन घाईत निघूनही गेली. विजय आणि कविताच लग्न ठरलं होत त्यापूर्वीच रमेश आणि रामच लग्नही ठरलं होत पण रमेश आणि रमाचे लग्न अगोदर व्हावे यावर सगळ्यांचे एकमत झाले. रमेश आता पूर्ववत झाल्यामुळे आणि त्याच्या भोवती प्रसिद्धीचा वलय वाढल्यामुळे त्याच्या जुन्या मैत्रिणी त्याच्या अधिक जवळ येऊ पहात होत्या त्यामुळे त्याच रमाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होत. रमाला मनिषाची जागा घेणं खूप अवघड होत पण रमाची जागा आता कोणीही घेऊ शकली असती.
— निलेश बामणे.
Leave a Reply