रमा आणि रमेशच्या लग्नात रमचा लहान भाऊ गणेश सर्वांची व्यवस्थित उठबस करत होता तोही एक उत्तम कवी होता आणि दिसायलाही सुंदर होता. या लग्नात प्रणय आणि नीलम यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसत होती, सोनल मात्र स्वप्नीलला थोडी टाळत होती. विजय आणि कविता नवरबायकोसरखेच सगलीकडे वावरत होते. येणाऱ्या पाहुण्यांच्या नजरा स्थिरावल्या होत्या त्या निलेश आणि प्रेरणावर कारण सध्याची नाटकाच्या क्षेत्रातील ती सर्वात आवडती जोडी झाली होती मध्ये मध्ये त्यांच्यातील प्रेमाच्या प्रसारमाध्यमात रंगवल्या जात होत्या. पण त्या फक्त चर्चा नव्हत्या ! त्या दोघांच्या प्रेमाला कोणाचाच विरोध नव्हता.
निलेश आणि प्रतिभाचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी त्यांच्यात वाद व्हायचेच त्याला कारणीभूत होती शलाका विजयच्या नवीन नाटकातील त्याची सह- अभिनेत्री ! विजयच्या लग्नाची तारीख जवळ येताच प्रतिभाची धावपळ वाढू लागली तिच्या मदतीला सासू – सासरे आणि मधुरा होतीच ! विजयच्या लग्नात अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते त्यात घरातच इतके प्रसिद्ध लोकं होती. या लग्नात कवितांची चुलत बहीण श्रद्धा उपस्थित होती. तीही कवितासारखीच रूपवान आणि गुणवान होती. गणेशने तिच्याशी ओळख करून घेतली होती. आता त्यांच्यात छान गट्टी जमली होती. विजय आणि कविता मधुचंद्राला निघून गेल्यावर अचानक निलेश आणि प्रेरणाने कोर्टात लग्न केले आणि एक भव्य मेजवानी दिली. त्या मेजवानीत प्रणय – नीलम, स्वप्नील – सोनल , गणेश – श्रद्धा, या प्रेमाच्या नवीन जोड्या उदयाला आल्या होत्या.)
अजय – प्रतिभा, विजय – कविता, निलेश – प्रेरणा आणि रमेश – रमा ही चारही जोडपी आता संसारात रमली होती. त्यांच्या हृदयातील प्रेमाची जागा आता हळूहळू व्यवहाराने घेतली होती. ते मनाने आणि बुद्धीने आता प्रगल्भ झाले होते. त्यांच्या वाटयाचे प्रेम आता जरून झाल्यामुळे त्यांना आता प्रेमाबद्दल फार आपुलकी राहिली नव्हती. लग्नानंतर एकाच वर्षात कविता गर्भवती राहिली तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्याच नाव ठेवलं ओमकार ! हा ! हा ! म्हबत तो दोन वर्षाचा झाला पण प्रतिभा आणि अजयला मात्र ती गोड बातमी मिळणार नव्हती. दोष अजयमध्येच होता. विजयने हे फार मनाला लावून घेतले नाही कारण विजयच्या मुलाला तिने आपला मुलगा कधीच मानला होता. रमाला आणि प्रेरणाला इतक्यात मुलं नको होती त्यांना त्यांच्या क्षेत्रात भरीव काम करायचं होतं. प्रणय त्याच्या काकांचा व्यवसाय सांभाळू लागला होता नीलम त्याच्या मदतीला होती. आता त्या दोघांचं लग्न ठरल्यात जमा होतं. काही दिवसात ते उरखलही त्यामुळे आता स्वप्नील – सोनल आणि गणेश – श्रद्धा यांनाही लग्नाचा विचार करणे भाग पडले. निलेशने त्याच्या ओळखीने स्वप्नीलला एका मालिकेत काम मिळवून दिले पण तेथे त्या मालिकेची निर्माती त्याच्या प्रेमात पडली आणि आपल्या भविष्या प्रति आशावादी असणाऱ्या स्वप्नीलने सोनलचा विचार न करता तिच्याशी अचानक लग्न केलं आणि सोनलच्या स्वप्नांची राख झाली. या धक्यातून सावरायला सोनलला खूप वेळ लागला पण ती सावरली, कविता आणि विजयलाही त्यामुळे खूप मनस्ताप झाला.
अजय आणि प्रतिभा लग्नाला सहा वर्षे झाली. मुलंबाळ नसलं तरी ते एकमेकांच्या सहवासात सुखी होते. अशात एक दिवस नीलम प्रतिभाला भेटायला आली. तिच्या आणि प्रणयच्या लग्नाला आता तीन वर्षे झाली होती. त्यांनाही मुलबाळ होत नव्हतं म्हणून प्रणय जो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा तोच तिला त्रास देऊ लागला होता. याबद्दल तिने घरी कोणालाच काही सांगितले नव्हते. पण प्रतिभाला तिने सारे सांगण्याचे ठरवले होते. म्हणून ती माहेरी आली हाती. ती प्रतिभाला म्हणाली, “वहिनी माझ्यात काहीच काहीच कमतरता नसताना मला विनाकारण त्रास देतो. वैद्यकीय तपासणी करून घे तर ते ही नाही माझ्यावर पुरुषी राग काढत असतो आता हे सारे मला असह्य होते आहे.” दुसऱ्या दिवशी प्रतिभाने प्रणयाला बोलावून घेतले आणि त्याला खडसावून विचारले असता तो म्हणाला, “हो ! मी नीलमला मुलं होत नाही म्हणून त्रास देतो कारण तिने मला खुशाल घटस्फोट द्यावा आणि दुसरं लग्न करावं ! मी माझी वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे . मी कधीच बाप होऊ शकणार नाही. प्रत्येक स्त्रीच आई होणं हे स्वप्न असतं तिचा अधिकार असतो म्हण ! आई न होण्याचं तुझ्या वाट्याला आलेलं दुःख तिच्या वाट्याला येऊ नये म्हणून करतो मी हे !” त्यावर प्रतिभा त्याला म्हणाली, “कोण म्हणालं तुला मी सुखी नाही म्हणून आणि लग्न काय फक्त मुलं होण्यासाठी करतात असं नाही . लग्न आपल्या जीवनाच्या अंतापर्यँत आपल्यावर जीवापाड प्रेम करणार कोणीतरी असावं म्हणून करतात. मुलं ही फक्त जीवनाचा एक भाग असतात. जीवन नसतात. तुम्हाला जर मुलंच हवंय तर ते अनाथाश्रमातून दत्तक घेता येईल की ! नीलमला आपल्यापासून दूर करण्याचा विचार सोडून दे !” आतल्या खोलीतून हे सारं ऐकणारी नीलम बाहेर नीलम बाहेर येऊन रडत रडत ती प्रणयला मिठी मारून म्हणाली, “मला आई नाही झाले तरी चालेल पण तुझी बायको म्हणवून घेण्याचा माझा अधिकार काढून घेऊ नकोस !
काही दिवसांनंतर प्रेरणाने जुळ्या मुलांना जन्म दिला त्यातील एक मुलं तिने नीलम आणि प्रणयला दत्तक देऊन आपल्या भावाचा आणि नंदेंचा संसार सावरला. यादरम्यान मधुरालाही हवा तसा जोडीदार मिळाला होता तिचा पूर्व इतिहास माहित असलेला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला पण तिने ती मुलगी प्रतिभाकडे सोपवली कारण ते दोघेही नवरा बायको सामाजिक कार्यात व्यस्त होते. प्रतिभाला आता मुलाची कमतरता कधीच भासणार नव्हती. रमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला तिचे नाव मनीषा ठेवले. सोनलनेही एक छान मुलगा शोधून त्याच्याशी विवाह केला. गणेश आणि श्रद्धा त्यांच्या क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावले आणि लग्न करून मोकळे झाले…आता या कथेतील सर्वांचाच प्रेमाच्या वाटेवर सुरु केलेला प्रवास थांबला होता म्हणून ही वाट कधीच मोकळी राहणार नव्हती…
*समाप्त*
— निलेश बामणे.
Leave a Reply