नवीन लेखन...

फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा

प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती.

एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं. प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं.

प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या ‘दीवार’ नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या ‘आग’ चित्रपटात ‘चित्रकार राजाबाब’ ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट ‘अजित’ या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई.

१९५१ साली प्रेमनाथची सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले. हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले.

ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली.

सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..