नवीन लेखन...

प्रेरणादायी इंदुताई

अश्विन १३ शकं सवतं १९४४ दि २२ आक्टोंबर कार्तीक कृष्ण द्वादशी वार शनिवार दिवस धनत्रयोदशीचा दिवाळी सणाचा दुसरा दिवस. वसुबारस पुजन आटोपुन सुगीच्या धामधुमीतच सर्व समाज दिवाळीच्या विलोभनीय आनंदात दीन दीन दिवाळी गायी म्हशी ओवाळी म्हणत शेतकरी राजा आपल्या धान्यांची जनावरांची पुजा करून निवांत होवून धनत्रयोदशी चा आनंद घेत होता. प्रत्येकाला दिर्घायुष्य, आरोग्य लाभावं त्यांचं सर्व आयुष्य रोगमुक्त व्हावं म्हणुन देवी धनवंतरीची पुजा करण्याचा दिवस होता. अश्विन महीन्याचा तेरावा दिवस म्हणजे आरोग्याची देवी धनवंतरी देवीचा दिवस होय. तीच्या कृपेने प्रत्येक मानवाला निरोगी दिर्घायुष्य लाभावं म्हणुन तीची पुजा केली जाते. त्याच बरोबर यमदीपदान करण्याचा दीवस म्हणजे आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू होवू नये म्हणुन यमदीपदान केले जाते. पण या दोन्हीचा योग आणी आमच्या ताईच्या जाण्याचा योग एकच झाला. ऐन दीवाळीत ना तीला धनवंतरी देवीचा आशिर्वाद लाभला ना यमदेवाची कृपादृष्टी तीच्यावर झाली.  दोन्ही देवांनी तीला ऐन दिवाळी दीवशी आणी त्यांच्याच पुजनाच्या दिवशी ताई ला आमच्या कुटुंबातुन त्याच्या कुटुंबात घेवून गेले.

देवी धनवंतरी देवीचा जन्म मुळात समुद्रमंथनातुन याच दिवशी झाला. पण ताईला त्यांनी याच दिवशी नेले असले तरी दिर्घायुष्याचे अमृत मात्र तीला त्यानी या आधीच पाजले होते. म्हणुनच ती ९० वर्षे या पृथ्वीतलावर अखंडपणे आपले पाय रोवून आपल्या कुटुंबासमवेत निवासी झाली. यमदेवाने सुद्धा कधी आपली अपदृष्टी  कधी तीच्यावर दाखवली नाही.  ती फक्त आणी फक्त त्यांच्या दिपदानादिवशीच दाखवली. ताई जरी गेली असली तरी ती ज्या समयी गेली ती वेळ खुप अद्भूत आणी विलोभनीय म्हणावी लागेल. कारण जन्म मरणाचा फेरा ज्यांच्या हातात असतो ते म्हणजे देवी धनवंतरी देवी आणी यमदेव यांच्या पुजनाच्या दिवशी ती गेली. हा योगायोग समजावा की चमत्कार….कारण इतक्या निस्वार्थी सुदर बालमनाच्या या ताईला देवानं आपल्या विशेष दिवशी बोलावलं असेल तर तो दिवस आणी ती व्यक्ती कीती विशेष असेल.?

ताई हे नाव इंदूबाई गणपती तोडकर या नावाने अख्या तोडकर भावकीत तीनशे साडेतीनशे लोकातच नव्हे तर अखंड गावात ओळखलं जात होतं. लहानापासुन थोरांपर्यंत तिला प्रत्येक माणूस ताई म्हणुनच हाक मारत असे. ताई या शब्दाची महतीच इतकी अगाध आहे की, ताई म्हणजे दुसरी आई, ताई म्हणजे मोठी बहीण, ताई म्हणजे ममता, ताई म्हणजे वास्तल्य, ताई म्हणजे निस्सीम प्रेंम, आणी ताई म्हणजे माया, या सर्व शब्दांचा संगम म्हणजे आमची इंदूबाई गणपती तोडकर (ताई) ताई, माझी चुलती पण तीचं प्रेंम आईप्रमाणे अस्तित्वात होतं. ती गेली तेव्हा सायंकाळ होती म्हणजे गोरज मुहुर्त. तीनं आयुष्य इतक्या चांगल्या पद्धतीनं घालवलं की तीच्या वंकुठागमनाचा क्षण देखील तीतक्याच चांगल्या पद्धतीनं आला. शांत निवांत चिरशांत पद्धतीने ती हळूवार एक एक क्षण आपल्यापासुन दुर जात आहे याची जाणीव होत होती. ती ईतक्या अलगद पद्धतीने हे जग सोडून गेली की, कळलं देखील नाही. शरीराला शेवटी कोणताही शारीरीक त्रास न होता ती या जगाचा निरोप घेवून चिरशांत झाली.

वडीलांची ती वहीणी

आई ची ती थोरली जाऊबाई

सदैव हसरी, सदैव प्रेमळ

ही कथा आमच्या ताईची

ताई आणी आई या दोघी जावा जावा असल्या तरी दोघींत जे नातं होतं ते प्रेमाचं आणी विश्वासाचं होतं. ती थोरली जाऊ असली तरी तीने कस्पटासम सुद्धा त्रास कधी आईला दीला नाही, की कधी दोघींच्यात वाद विवाद भांडण कधीच झालं नाही. ईतकी ती मयाळू होती.  वडीलांना आदराचं स्थान देवून मानसन्मान राखणारी ताई प्रेमाचा अथांग सागर होती. ती गेली आणी मला माझं बालपण आठवलं तीच्यासोबत ऊन्हाळ्यात दारात झोपतं तीच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टी तीच्या सोबत केलेली मौजमजा, तीच्या सोबत घालवलेली उन्हाळी सुट्टी, हे सर्व अस्पष्ठ आठवू लागलं.

गोड गोड शब्दांचा

खजाना आता रीता झाला

ताईच्या जाण्याने आता

आईसम गोडवा कमी झाला

इतकी प्रेमळ मायाळू ताई सर्वांची प्रिय होती. लहान बहीण मीना ची तर एकदम लाडकी ताई होती ती.  कारण आयुष्यातील बराचसा वेळ तीने तीच्या सहवासात व्यतीत केलेला होता. तीला ती कधी विसरायची नाही. आपल्या नातवंडावर मुलांप्रमाणे प्रेम करणारी ताई अखेरचा क्षण देखील नातीच्या (अश्विनी ) च्या  सहवासात गेला प्रत्येक वेळी प्रत्येक घडीला आशे आशे करणारी ताई तीच्या सोबत तीच्या सहवासात आखंड राहीली. अगदी लहान बाळाप्रमाणे. आपलं कुटुंब आपले आप्तेष्ठ यांना प्रेम माया आदर देणारी ताई कुटुंबातुन गेली आणी घरातील ते प्रेम, माया, आदर, कमी झाल्याची भावना मनात तयार झाली.

ताई तुझ्या जाण्याने

घर सारे सुन्न झाले

या वेड्या लेकरांचे

मन आठवणीत चिंब झाले

बाल्यावस्था, कीशोरावस्था, प्रौढावस्था, म्हातारपण, व पुन्हा बाल्यांवस्था आशा सर्व अवस्था पुर्ण करत ती दीर्घायुषी झाली.

तिचं कर्मच इतकं प्रबळ होतं की, तीचा शेवटचा क्षण ही तीतकाच प्रबळ ठरला. कर्माची ताकद इतकी मोठी होती की, तीच्या आयुष्याला ती प्रत्यक्षपणे उपयोगी ठरली. इतकी चांगली ताई, पुन्हा होणे नाही, असं मला वाटतं

ताई मायेचं साजुक तुप

आईचं ते दुसरं रूप

प्रेमळ तीची हाक

सदैव प्रेमाची साथ

ती इतकी मनमीळावू प्रेमळ होती की, तीच्या सहवासात राहणं सर्वांना आवडायचं. प्रत्येक कुटुंबात वाद विवाद एकमेकांशी तात्पुरत्या स्वरूपात होत असतात. हे उघड्या डोळ्यांनी मी पाहीलय पण तीला मात्र कधी कोणाशी भांडताना वाद विवाद करताना ना मी कधी पाहीलय ना कधी ऐकलय. एक मायेचं प्रेमाचं कोठार होतं, ते आज रीकामं झालं, पुन्हा न भरून येण्यासाठी. ते रीकामं  कोठार नेहमी तीची आठवण करून देत राहील. कारण प्रेम, माया , आपुलकी, आदर , विश्वास, यांचं कोठार होतं ते कायम भरलेलं, आज ते रीकामं पाहताना मनाला वेदना होतात.

सासु असावी तर ताई सारखी

जाऊ असावी तीही ताई सारखी

सुन व्हावी तीही ताई सारखी

प्रेमळ,प्रसन्न,शांत,मायेच्या उबे सारखी

लेखकाचे नाव :
उमेश महादेव तोडकर
लेखकाचा ई-मेल :
librumesh56@gmail.com

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..