हल्ली भेटवस्तू द्यायच्या असतील तर पुन्हा एकदा गहन प्रश्न पडायला लागलाय काय द्यायचे ? पूर्वी लग्नामध्ये ५-५,६-६ मिल्क कुकर्स,कफ लिंक्स,४/५ लेमन सेट प्रेझेंट आलेले असायचे. नंतर फ्लॉवर पॉटस, स्टीलची भांडी,घड्याळे,पेन्स,रुमाल. आता अगणित निरुपयोगी चीनी वस्तू,गणपतीच्या विविध मूर्ती,नको असलेले शो पिसेस. काय द्यायचे प्रेझेंट ?… लोकं पुन्हा रोख रक्कमच देण्याकडे आता पुन्हा वळायला लागली आहेत. मी स्वत: बनविलेल्या पाकिटातून असा आहेर किंवा भेट देतो. सोबतची शाळेतील पाटी ही काळा कागद व पट्ट्यांचा वापर करून बनवली असून त्यामागे रोख राक्कामेसाठी पाकीट आहे. १०वी उत्तीर्ण झालेल्या एका मुलीला मी असेच पाकीट दिले होते ती मुलगी आज वकील झाली तरी तिने ते जपून ठेवले आहे. साध्या की चेनला असलेल्या छान बाहुल्या चिकटवून बारशाचा आहेर देता येतो. बडीशेपेच्या गोळ्या भरलेल्या बदकाचे २ उभे तुकडे चिकटवून मुला-मुलींचे नाव लिहायला पताका करता येते.छोटी गणेशमूर्ती,प्लास्टिकचे छोटे गुलाब फुल व गवत (दुर्वा) चिकटवून आकर्षक पाकीट तयार होते. २ छोटी कागदी भिरभिरे किंवा छोट्या (लहानपणी पाण्यात सोडायला करायचो तश्या ) होड्या पाकिटांवर चिकटवून उत्तम पाकिटे तयार होतात’ सोबत काही पाकिटांची छायाचित्रे देत आहे. त्यावरून अनेकांना अधिक चांगल्या कल्पना सुचू शकतील. नवीन वर्षाचा हा एक नवा उपक्रम !
— मकरंद करंदीकर.
Leave a Reply