नवीन लेखन...

राष्ट्रपती पदक विजेते वगसम्राट दादू इंदूरीकर

राष्ट्रपती पदक विजेते वगसम्राट दादू इंदूरीकर यांचा जन्म १९२१ सालात मावळ तालुक्यातील इंदूरी येथे झाला.

दादू इंदूरीकर यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. लोक प्रेमाने त्यांना दादोबा म्हणायचे.तसेच महाराष्ट्राचे पॉल मुनी असा सार्थ गौरव त्याचा केला जात असे. त्यांनी ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.

दादू इंदूरीकर यांचे शिक्षण सातवी पर्यंत. दादोबा खरं म्हणजे शिक्षकच व्हायचे पण शिक्षणासाठी हाती पेन घेण्या ऐवजी त्यांनी गळयात ढोलकी अडकविली. दादोबा राघु इंदूरीकरांच्या तमाशात सहभागी झाले. ते उत्तम ढोलकी वाजवायचे. दादोबा रूढ अर्थात ढोलकीवादन नव्हेत. ते होते उत्तम सोंगाडे. तो काळ तमाशाचा सुवर्णकाळ समजला जातो. पठ्ठेबापूराव, भाऊ फक्कड, राघु इंदूरीकर, दशरथ लोहगावकर, मनवेकर, शिवा संभा कवलापूरकर, उमा चांडोलीकर, अर्जुना वाघोलीकर, हरीभाऊ साळी, दगडू साळी शिरोलीकर, रामा वर्दनगडकर, हरीभाऊ आनविकर असे अनेक मान्यवर तमाशा कलावंत या सुवर्ण काळाचे नेतृत्व करीत होते. आपले वडील, आजोबा तसेच मुकुंदा लहरी यांच्या कडून दादोबांनी तमाशाचे शिक्षण घेतले. व वडीलांच्या निधनानंतर स्वत:चा फड काढला पण त्यांचा तंबू जळाला व दादोबा कर्जबाजारी झाले. २० वर्षे स्वत:चा तमाशा फड चालविल्यावर दादोबांनी जसराज थिएटर या मधुकर नेराळे यांच्या नाटयसंस्थेत काम करण्यास सुरवात केली. शंकर घाणेकर यांच्या सोबत त्यांनी वगनाटय, लोकनाटयातून काम केले. ‘गाढवाचं लग्न` या वगनाटयातील दादू इंदूरीकर यांची सावळया कुंभाराची भूमिका अजरामर ठरली. सावळया कुंभाराचा नर्म विनोद हा मराठी लोकरंगभूमीच्या इतिहासात सोंगाडपणातील मैलाचा दगड ठरला. दादोबा म्हणजे विनोदाचा साक्षात धबधबा. एकदा त्यांना मुलाखतीत विचारले तुम्हाला बायका किती ? दादोबा पटकन उत्तरले ‘लग्नाची एक आणि विघ्नाच्या अनेक` शाब्दीक कोटया करण्यात दादोबा आणि दादा कोंडके या गुरू- शिष्या इतकेच दुसरे कोणी वाकबगार अभिनेते नव्हते. गाढवाच लग्न, आतून कीर्तन वरून तमाशा, राणी अहिल्याबाई होळकर, मिठ्ठाराणी आदी. वगनाटय, लोकनाटया मधील दादोबांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. अंगिक, शाब्दीक विनोदाचा दादोबा म्हणजे मूर्तिमंत वस्तूपाठ होते.

दादू इंदुरीकर यांना तर महाराष्ट्राचे ‘पॉलमुनी’ असा किताब पु. ल. देशपांडे यांनी दिला होता. १९७३ साली त्यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. शंकर शिवणेकर, वसंत अवसरीकर, शंकर घाणेकर, मधु कडू आदी कलावंतांना दादोबांसोबत अभिनय करण्याची संधी प्राप्त झाली. दादू इंदूरीकरांचे चिरंजीव गणेश इंदूरीकर यांनी देखील आपल्या वडीलांची परंपरा चालविली होती.

‘कहाणी वगसम्राटाची’ हे दादू इंदूरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे. या वगात गंगीचे काम करणार्या प्रभा शिवणेकर यांचे ‘एका गंगीची कहाणी’ नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने हे चरित्र पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.

दादू इंदूरीकर यांचे १३ जून १९८० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..