पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं कायद्याने अनिवार्य करणं आवश्यक आहे.
काल-परवाच एक व्हीडीओ पाहिला. एका लहान मुलीला तिची आई हवीय. तिला भुकही लागलीय. पण ती ज्या शाळा नामक पिंजऱ्यात आहे, त्या पिंजऱ्याची टिचर नामक रिंगमास्टर तिला इंग्रजीतून प्रश्न विचारतेय. ती लहान मुलगी अगदी असहाय होऊन रडतेय, तर ती रिंगमास्टर तिला दम देऊन हसायला सांगतेय. काळीज पिळवटून जाणं काय असतं, ते हा व्हीडीओ पाहून कळतं आणि मनाचा संताप संताप होतो.
अरे कुठे चाललोत आपण? त्या बारक्या जीवाला त्याच्या भाषेतून व्यक्त व्हायलाही बंदी का घालतोय. किती ते इंग्रजीच्या नादाला लागायचं? आपल्यावर असे अत्याचार का होतायत, ते त्या निरागस मुलांना कळत नसणार, परंतू त्यांच्या नतद्रष्ट पालकांनाही (खरं तर कसायांना) आपण आपल्याच जीवाच्या तुकड्यांवर अत्याचार (मला बलात्कार असं म्हणायचंय खरं म्हणजे) करतोय हे कळत का नाही हे मला तरी समजण्याच्या पलिकडचं आहे..जाऊ दे, यावर बोलावं तिककं कमी आहे, सारेच कोडगे होऊन आपलीच माती, संस्कृती रसातळाला पोहोचवू इच्छीतायत, त्याला कोण काय करणार. आपल्याला गुलामच जन्माला घालायचेत असं आपणच ठरवलं, तर कोणी काहीच करू शकत नाही, आपण आपल्याच विनाशाला कारणीभूत ठरतोय..
ज्यांना माझ्याप्रमाणेच वाटतं, की मुलांना पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून मिळणं हा त्या मुलांचा अधिकार आहे, त्या सर्व पालकांनी मा. मुख्यमंत्री, मा. पंतप्रधान आणि मा. राष्ट्रपती यांना तशी विनंती करणारी जास्तीत जास्त पत्र आपापल्या मातृभाषेत पाठवावीत. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागली तरी करा म्हणावं, पण मुलांना त्यांच्या भाषेत शिकण्याचा हक्क कायद्याने मिळवून द्या, अशी त्या पत्रात आग्रहाने केलेली मागणी असावी. कुत्र्या-मांजरांच्या हक्कांसाठी भांडणारे आपण, आपल्याच पिलांसाठी का भांडत नाही?
आपल्या पैसे कमावण्यातून काही वेळ काढा आणि असं पत्र लिहा ही कळकळीची विनंती. देश वाचावायचा असेल तर हे लगेच करणं गरजेचं आहे. परदेशातही आपल्या राष्ट्रभाषेत बोलणारे आपले पंतप्रधान कदाचित आपल्या अशा मागणीचीच वाट पाहात असतील, ती करा, तसा कायदा पंतप्रधान नक्की करतील. हल्लीच त्यांनी नेदरलॅन्डमधे केलेलं भाषण ऐकल्यावर, त्यांना हा धोका जाणवतोय असं स्पष्ट समजतंय. त्यांना तसा कायदा करायचाही असेल, तर त्यांच्यमागे जनमताचा भक्कम आधार असला पाहीजे.
मग लिहीताय ना तसं पत्र?
मुलांसाठी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून अनिवार्य होण्याचा कायदा करण्याचा..
मा. मोदींचं भाषण या लिंकवर पाहाता/ऐकता येईल.
https://www.youtube.com/watch?v=MF6MMHVc3Dg&sns=em
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply