पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी एका कार्यक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित केले होते.
राष्ट्रीय युद्ध स्मारक हे ४० एकरांवर पसरलेलं आहे. या युद्ध स्मारकामध्ये स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांचं नाव कोरलेलं आहे.
राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.
राष्ट्रीय युद्ध स्मारकात मध्यवर्ती स्तंभ, अक्षय ज्योत आणि भारतीय सैन्यदल, हवाई दल आणि नौदलाने लढलेल्या प्रसिद्ध लढाया दर्शवणाऱ्या सहा कांस्य चित्रांचा समावेश आहे.
राष्ट्रीय युद्ध स्मारका सोबतच याठिकाणी एक संग्रहालयही बांधण्यात आले आहे. या ठिकाणी भिंतीवर २५ हजार ९४२ शहीदांची नावे लिहिण्यात आली आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या भिंतीवर युद्धाशी संबंधित कलाकृती लावण्यात आल्या आहेत. यात सियाचिनसह कारगिल युद्धादरम्यान टायगर हिल ताब्यात घेतलेली क्षणचित्रे आहेत.
पहिल्या महायुद्धात भारताच्या ८४ हजार शहीद जवानांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी इंडिया गेट उभारले होते. त्यानंतर १९७१ च्या युद्धातील ३ हजार ८४३ शहीद जवांनांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती स्मारक बांधण्यात आले होते.
‘परम वीर योद्धा स्थलवर २१ परमवीर चक्र विजेत्यांचे अर्धपुतळे आहेत, यामध्ये सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) बन्ना सिंग (निवृत्त), सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव आणि सुभेदार संजय कुमार या तीन हयात विजेत्यांचा समावेश आहे.
शहीदांना आदरांजली अर्पण करणाऱ्या कृतज्ञ देशाच्या एकत्रित भावनांचा राष्ट्रीय युद्ध स्मारक हा अविष्कार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply