प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांचा जन्म १ जुलै १९६१ रोजी झाला.
प्रिन्सेस डायना, हे नाव बरंच काही सांगून जातं. मुळात त्या नावामागे अशा काही गोष्टी दडल्या आहेत ज्या त्या व्यक्तीसोबतच या जगातून निघूनही गेल्या. ती व्यक्ती म्हणजे प्रिन्सेस डायना. सामान्य लोकांच्या राणी म्हणूनही त्यांना जगभरात ओळखलं जायचं. सोबतच प्रगत विचार आणि समाजाप्रती असणारी बांधिलकी जाणणारी ब्रिटनच्या राजघराण्यातील एक व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिलं जायचं. लग्नापूर्वीची डायना स्पेन्सर. डायना अवघ्या ९ वर्षांच्या असतेवेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. हा त्यांच्यासाठी एक धक्काच होता. डायना जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबत एन्गेजमेंट झाली त्यावेळी डायना किंडरगार्डनमध्ये शिक्षिका होत्या.
लेडी डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर विविध व्यावसायिकांनी याच संधीचा फायदा उचलत एक प्रकारे मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मासिकं, म्हणू नका किंवा कॅफे शॉप, सर्वत्र याच जोडीची झलक पाहायला मिळाली होती. जणू काही हा एक ट्रेंडच आला होता. सहसा ब्रिटनच्या शाही घराण्यातील विवाहसोहळे लंडनच्या वेस्टमिन्सटर अॅबी चर्चमध्ये पार पडतात. पण, या चर्चमध्ये पुरेशी बैठकव्यवस्था नसल्यामुळे प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचा विवाहसोहळा सेंट पॉल कॅथेड्रल चर्च येथे पार पडला होता. त्यांच्या विवाहसोहळ्याला ३,५०० पाहुण्यांची उपस्थिती होती. तर, उर्वरित लाखोंच्या संख्येने हा विवाहसोहळ्या टेलिव्हीजनच्या माध्यमातून पाहत होते. डायना यांच्या वेडिंग गाऊनच्याही चर्चा आजतागायत सुरुच आहेत. डायना यांचा बहुचर्चित आयव्हरी टाफेटा गाऊन हा जवळपास १० हजार मोत्यांनी सजवण्यात आला होता ज्यामुळे तो खऱ्या अर्थाने खास ठरला होता. प्रिन्सेस डायना यांच्या वेडिंग गाऊनने एक नवा रॉयल रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. या वेडिंग गाऊनची ट्रेन २५ फूट लांब असून, ती सर्वात लांब ट्रेन ठरली.
प्रिन्सेस डायना यांची विविध नावांनीही ओळख होती. प्रिन्सेस ऑफ वेल्स म्हणून त्या ओळखल्या जात होत्याच. पण, त्याशिवायही त्या डचेस ऑफ कॉर्नवल म्हणूनही ओळखल्या जायच्या. हेअरस्टाईलपासून ते अगदी ड्रेसिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत सर्वजण प्रिन्सेस डायना यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. जगातील सर्वात लोकप्रिय फॅशप्रिय महिलांमध्येही त्यांचं नाव घेतलं जायचं. कॅथरिन वॉकर, ख्रिस्टीयन लाक्रोइक्स, व्हर्लासे, जिम्मी चू आणि इतरही बरेच लोकप्रिय ब्रँड आणि त्यांची उत्पादनं वापरण्याला त्या प्राधान्य देत.
प्रिन्सेस डायना यांचे ३१ ऑगस्ट १९९७ रोजी पॅरिसमध्ये झालेल्या एका कार अपघातात निधन झाले. डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद कार मध्ये होते असे म्हणतात.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे
Leave a Reply