नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात

निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग पाच !

निसर्ग निसर्ग म्हणजे तरी काय ?
साधे सोपे उत्तर येईल.
व्यवस्था.
निसर्ग म्हणजे व्यवस्था, नियम.

सूर्य उगवतो, अस्ताला जातो. दिवस होतो, रात्र होते, ग्रह विशिष्ट दिशेने फिरतात, उपग्रह फिरतात. त्याच्यामुळे ग्रहणे होतात, वारा वाहातो, झाडे बहरतात, फुल उमलते, फळ बनते, झाडावरून फळ खालीच पडते, बी तयार होते, इकडे तिकडे जाते, पुनः नवीन वृक्ष बनतात.

हे सर्व काय आहे ?
त्याने नेमून दिलेले नियम आहेत. त्रिकालाबाधित सत्य !
कधीही न बदलणारे अंतिम सत्य म्हणजे निसर्ग !

या त्रिकालाबाधित सत्यांचा शोध घेत गेले असता, एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निसर्गाने बनवलेले नियम निसर्गातील सर्वासाठी सारखेच बनवलेले आहेत. तिथे कुठेही, जात, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत, राजा रंक, पौर्वात्य पाश्चिमात्य, पशू पक्षी, मानव अमानव, असा भेदभाव दिसत नाही. या नियमात कमालीची शिस्त आहे, या नियमात तसुभरदेखील फरक पडत नाही, आणि जर असा फरक पडला तर खुशाल समजावे, तो नियम निसर्गाचा नाही. बेशिस्त किंवा ढवळाढवळ निसर्गाला अजिबात खपत नाही. जर काही लुडबुड झालीच तर नुकसान होणार हे शंभर टक्के ठरलेले !

हा एक नियम गांभीर्याने समजून घेतला की आरोग्य समजून यायला वेळ लागणार नाही.

मृत्युबद्दलची भीती, मृत्यु येऊ नये यासाठी नियमितपणे आहार, घेतलेला आहार योग्य रितीने पचण्यासाठी पुरेशी विश्रांती, आणि आपण जाताना पुनः “आपणासारखे करिती तात्काळ” या उक्तीला आवश्यक असलेले मैथुन, या चार गोष्टी निसर्गाने वरील सर्वासाठी नेमून दिलेल्या आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या नियमांच्या मर्यादेलाच “धर्म” असेही म्हणतात. मानव आणि अमानव योनीमधे मागे पाहिलेल्या दूष्य देश बल काल या सूत्राप्रमाणे अवस्था बदलत जातील, त्यात योग्य तो बदल प्राप्त परिस्थितीनुसार करावा.

असाच धर्म शरीराचादेखील असतो. याला शरीरधर्म असे म्हणतात. रात्री झोप घेणे, सकाळी आपोआप जाग येणे, भुकेची जाणीव होणे, तहान लागणे, मल मूत्रादि उत्सर्जन क्रिया, (शरीरवेगांच्या संवेदना) कळणे, काम करताना उर्जा निर्माण होणे, त्यातून आनंद निर्माण होणे, याला “निसर्ग” म्हणतात. म्हणजे निसर्गाच्या नियमामधे बिघाड होत नाही. जे घडते ते घडू द्यावे, त्याविरोधात गेलो तर बिघडते.
उलटी होत असेल तर होऊ द्यावी, घाम येत असेल तर येऊ द्यावा, झोप येत असेल तर झोपावे, दमलो तर विश्रांती घ्यावी, भूक लागल्यावर जेवावे, तहान लागल्यावर पाणी प्यावे, निसर्ग असाच वागतो. कुठेही निसर्ग चक्र विस्कळीत झालेले दिसत नाही.

माणसाने जेव्हा यात बदल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निसर्ग सुद्धा कोपतो.

आम्ही आमच्यासाठी निसर्गाच्या नियमात पालट करण्याचा प्रयत्न केला तर रोग होणारच.

पण आजच्या काळानुसार, ज्यांना आपल्याला निसर्गाचे वेळापत्रक पाळणे अशक्य आहे, त्यांनी काय करावे ?
निसर्गाला जाणून घ्यावे. आणि दूष्य देश बल काल आदि ओळखावे. जेवढ्या शक्य आहेत, तेवढ्या आपल्या कामाच्या खाण्या पिण्याच्या वेळा निसर्गाला अनुकुल होतील अशा करून घ्याव्यात. जर काही बिघाड झालाच तर वैद्यांच्या सल्ल्यानुसार निसर्गदत्त औषधींचाच वापर करावा.
इथे पुनः रक्तघटक एवढेच पाहिजेत, अमुक या लेव्हलच्या वर नको, याच्या खाली नको, असे अभारतीय नियम करून घेऊ नयेत. हे सर्व “मॅनमेड नियम” केवळ शरीराचे ढोबळमान समजून घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी आहे. हे जरूर शिकावे, पण या शरीर तपासण्या हे अंतिम सत्य नाही, हे पण लक्षात ठेवावे. मानवनिर्मित नियमांचा वापर युक्तीने व्हावा, नियमाने होऊ नये. मानवाने केलेले नियम हे अर्धसत्य असतात, निसर्ग हेच पूर्ण सत्य आहे, हे आपण मागे बघितलेले आहेच !

कृत्रिमपणे केलेला विचार आणि सहजपणाने झालेली कृती यात फरक असतोच ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..