नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग छापन्न

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 12

वस्त्र अलंकार झाल्यावर तिलक धारण केला जातो. देवाला भ्रूमध्य स्थानी चंदनतिलक केला जातो.भ्रूमध्य हे स्थान आज्ञाचक्राचे आहे. या चक्राला तिलक लावणे म्हणजे आज्ञाचक्राला संरक्षण देणे होय. जणुकाही फिल्टरच ! जे योग्य असतील तेवढीच सकारात्मक स्पंदने आत पाठवणे आणि नको असतील ती नकारात्मक स्पंदने बाहेर ठेवणे, अशी दोन कामे हा मंगल तिलक करत असतो. दक्षिण भारतात तर तिलक लावल्याशिवाय पुरूषदेखील घराबाहेर पडत नाहीत.

उगाळलेले चंदन, रक्तचंदन, अष्टगंध, केशर, कुंकू, हळद, गोपीचंदन इ. लेप या आज्ञाचक्रावर लावले जातात. देवतांना चंदनतिलक लावताना अनामिकेने, म्हणजे करंगळीजवळच्या मरंगळीने लावावे. स्वतःला किंवा दुसऱ्याला लावताना मधल्या बोटाने भ्रूमध्यावर लावावे.

भ्रूमध्य हेच स्थान आत्म्याचे स्थान सांगितले जाते. म्हणजे इथे लावलेले लेप ही एक प्रकारची प्रत्यक्ष स्वपूजा किंवा आत्मपूजाच आहे.

मी हिंदु आहे, हे न सांगताच समजले पाहिजे, हे ओळखण्यासाठी हा तिलक काम करत असतो. इतर कोणत्याही धर्मात असा मंगल तिलक दररोज लावला जात नाही. पण आज सर्व धर्मसमभावाच्या गोंडस संस्कारांनी, “मी हिंदु आहे” असे अभिमानाने सांगायची पण लाज वाटू लागली आहे.

भारतीय सौभाग्यवती महिलांचे “मांग मे सिंदूर भरना” अगदी अनिवार्यच असते. आता तर सिरीयल्स पाहून महाराष्ट्रीयन भगिनीदेखील मांग मे सिंदूर भरने लगी है ।
प्रश्न नवयुवतींचा आणि समस्त पुरूष वर्गाचा आहे. पुरूषांना कपाळी केशरी गंध आणि महिलांना हळदीकुंकु लावणे म्हणजे मागासलेपणाचे आणि बुरसटपणाचे वाटते. काही वर्षांपूर्वी टिकली तर टिकली होती, आता तीपण टिकत नाही. त्याचे शास्त्र आणि त्यामागील भारतीय दृष्टीकोन वेळीच न समजल्याचे हे दुष्परिणाम आहेत. आता तरी जागे होऊया. संस्कृतीचे पालन करूया.

देवासाठी “चंदनं समर्पयामी” आणि देवीसाठी “हरिद्राकुंकुमम् सौभाग्यद्रव्यम समर्पयामी” हे जसे सांगितले आहे तसेच आपल्या देहासाठीदेखील आहे, हे दोघांनीही लक्षात ठेवूया. पालकांनी आपली थोडी कडक भूमिका आपल्या घरातील देव आणि देवींना, समजावून सांगितली तर षटचक्र दूषित झाल्यामुळे बिघडलेले काम क्रोध आदि रिपु सहजपणे जिंकता येतील.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.06.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..