नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणसाठ

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 15-पुष्प तिसरे

फुल हा नाजूक आणि नाशीवंत अवयव ! त्याचे आयुष्यही एखाद्या दिवसाचेच!!! त्यामुळे फूल टिकणेही कठीण. टिकवणेही कठीण. पण त्यापासून मिळणारा मध मात्र टिकतो.

फुले देवाला वाहाताना देठ काढून वाहतात. जे द्यायचे ते उत्तम गुणाचे. जसे देहाला तसेच देवाला. आपणही अन्नाचा दर्जा, प्रत, पाहूनच माल खरेदी करतो. धान्य निवडतो, त्यावर संस्कार करतो, निवडणे, आसडणे, पाखडणे, घोळणे, चाळणे, धुणे, सुकवणे, वाळवणे, चिरणे, खोवणे, तळणे, भाजणे, उकडणे, वाफवणे, शिजवणे, परतणे, इ.इ. यापैकी कोणता तरी संस्कार करतो आणि नंतरच वापरतो. हा फरक आहे पशु पक्षी आणि मानवामधील. जी बुद्धी आहे, ती वापरली तरच पचन सुलभ होते.

देवाला देताना सुद्धा जे जांगले असेल तेच द्यावे. देवाला दिलेले परत आपल्याकडेच येत असते. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार देवाला नैवेद्य उत्तम पदार्थांचा दाखवला तर तो परत आपल्याचकडे येणार आहे. कारण तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपणच सेवन करणार असतो.

फुले सुद्धा निवडूनच अर्पण करावीत. किडकी, शिळी, मनात राग ठेवून ओरबाडलेली फुले देवाला सुद्धा चालत नाहीत.

फुले, पाने, ओरबाडायची तर नसतातच, पण तोडायची पण नसतात, तर खुडायची असतात. खुडणे हा संस्कार फक्त फुलांसाठी. खुडताना नखांचा वापर केला जातो. तोडण्यासाठी बोटे वापरली जातात. ( आणि माणसे तोडण्यासाठी शब्द !) डोलणारे फूल एकदा फांदीवरून तोडले की फांदीपासून कायमचेच वेगळे होत असते. ते परत जोडता येत नाही. ( माणसांचे मात्र तसे नाही. “क्षमस्व” मनापासून म्हटले तर तोडलेली नाजूक माणसे देखील जोडली जातात. पण मनापासून साॅरी म्हणायला आलं पाहिजे. काही माणसांना मनापासून “साॅरी” सुद्धा म्हणता येत नाही. तोंडदेखलेपणाने “साॅरी” म्हणतात, हे मोठ्या मनाने ऐकून घेणाऱ्याच्या सहज लक्षात येते. समर्थांनी नमस्कार करण्याचे फायदे दासबोधातील एका समासामधे छान वर्णन केलेले आहेत. असो ! )

फुल खुडताना अगदी हलकेच खुडायचे असते. नखांनी हळुवारपणे खुडायचे असते. फांदी, पान यांना अजिबात धक्का न लावता. खुडल्यामुळे फुलांच्या देठातील रस आपल्या नखात शिरत असतो. मेंदी लावल्यावर कसं नख रंगतं, म्हणजे मेंदीचा रस जर नखातून आरपार जिरतो तर फुलांचा रस देखील नखातून शरीरात जातो. (दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासली असता केसांचं आरोग्य चांगलं राहाते, असे प.पू. स्वामी रामदेवबाबा म्हणतात.) म्हणजेच नखे हा देखील शरीरात औषध देण्याचा एक मार्ग आहे. व्यवहारात हे लक्षात येत नाही.

वेगवेगळ्या फुलामधे वेगवेगळे अर्क असणार, वेगवेगळी फुले खुडली की, ते सर्व प्रकारचे अर्क आपल्या नखातून शरीरात शोषले जाणार. शरीराच्या दृष्टीने काही उपयोगी असतील काही निरूपयोगी. ते शरीर ठरवेल. आपलं काम शरीरात अन्न पोचवणे ! त्यातून काय निर्माण करायचं, कसं निर्माण करायचं, किती टाकायचं किती वापरायचं, हे तो ठरवेल ! आपण आपलं नेहेमीचं काम, धर्म म्हणून करावं. फळाची अपेक्षा न ठेवता ! फळ तर मिळणारच असते. हाच तर त्याचा नियम आहे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.06.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..