पृथ्वीराज कपूर यांनी देशाला पहिला बोलपट दिला होता. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०१ रोजी झाला. दिवंगत पृथ्वीराज कपूर यांचा जन्म पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दीवान बशीश्वरनाथ कपूर आणि आईचे नाव रामशरणी मेहरा होते. दीवान बशेश्वरनाथ कपूर यांनी राज कपूर यांच्या गाजलेल्या आवारा सिनेमात एक कॅमिओ रोल केला होता. कपरू घराण्यात पृथ्वीराज कपूर यांनी अभिनयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला पहिला बोलपट दिला.
६ फूट २.५ इंच उंची असलेले पृथ्वीराज कपूर यांनी मुगल-ए-आझम या सिनेमात साकारलेली अकबरची भूमिका अविस्मरणीय आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. पृथ्वीराज कपूर यांना तीन मुले एक मुलगी होती. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशि कपूर ही त्यांच्या मुलांची नावे तर उर्मिला सियाल हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
पृथ्वीराज कपूर यांनी ‘मुघल-ए-आझम’मध्ये उभा केलेला अकबर बादशाह हा जणू खराखुरा अकबर वाटतो. खरा अकबर आपण कोणी पाहिलेला नाही. पण तो असाच असेल, असे पृथ्वीराज कपूर यांचा अभिनय पाहून सतत वाटत राहतो. कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील मोठे घराणे आहेत. अभिनय तर या घराण्याच्या रक्तात आहे. अशा या घराण्यांच्या यादीत पृथ्वीराज कपूर यांचे घराणे एक विलक्षण घराणे आहे. ते स्वत: एक उच्च दर्जाचे अभिनेते होते. याच कारणामुळे भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत या घराण्याच्या प्रत्येक पिढीने अभिनय क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे, पृथ्वीराज कपूर यांच्या नावाची ‘पृथ्वी थिएटर’ ही संस्था अजूनही कार्यरथ आहे. मा.पृथ्वीराज कपूर यांचे निधन २९ मे १९७२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply