यंदा देशात सलोख्याचं वातावरण निर्माण झालय ही खुप समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे कारण नजीकच्या काळातील काही प्रिय घटना या परिस्थितीला साजेशा आहेत अर्थात छोटा – मोठा अपवाद असेलही पण त्यामुळे या आनंदावर विर्जण पडावं एवढही काही मोठं अघटित घडलं नाही, नाही म्हणायला नको ते ऐकायला लावणारे व कल्पनाही करवत नाहीत असे प्रसंग दिवसागणिक घडत असतात पण जीवनच क्षणभंगूर आहे तर मग या गोष्टींचा बाऊ करुन रडत का बसायचं जुनं ते झटकून नव्या लौकीकाला साजेसं वर्तन करीत राहण्यातच मौज घेता येते हा निष्कर्ष एवढ्यासाठी काढला की, मागच्या काही वर्षांत भारतावर जी संकटं आलीत त्यामूळे भारतातील मानसिक वातावरण पूर्णत: ढवळून निघालं होतं. भारतातील माणूसच एकमेकांकडे शत्रू म्हणून बघत होता यातील काही घटना शेजारच्या राष्ट्रांनी घडवून आणल्यात तर काही आपल्याच देशातील लोकांनी घडविल्यात शेजारी राष्ट्र पाकीस्तानातील भारता विरुध्दची कुरघोडी, काश्मीरच्या सीमेवरुन भारतीय प्रांतात घुसून उपद्रव घालणे, एवढच नव्हे तर भारतीयांच्या जिवाशी खेळण्याचे धाडस करुन भारतातील आंतरिक सुरक्षेला आव्हान देण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नाने भारतातील जनजीवन विशेषत: काश्मीर मधील वातावरण भयभीत झाले होते. आपल्या भारतातल्या जवानांनी तर स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता नागरिकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य अतिशय चोखपणे बजावून प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने फुलून यावा अशी दिमाखदार कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांच्या कृत्यामुळे भारतीय समाजमन व्यथित अन् क्रोधीत झाले होते त्यात पाकीस्तानचे राष्ट्रपती तेथील अणू शास्त्रज्ञ, लष्कर प्रमुख व इतर गुप्तहेरांनी भारता विरुध्द जातीयतेचे विष पेरण्याचा अश्लाघ्य प्रयत्न देखील केला होता. पण सुदैवाने त्याला यश आले नाही अतिरेक्यांच्या यशस्वी दुष्कत्याने मात्र निरपराध नागरिकांना नाहक बळी पडावे लागले होते. ही होती एक बाजू! दुसरी बाजू भारतातील आंतरिक राजकीय कलह! रामजन्मभूमी आंदोलन अन् बाबरी मशीद उध्वस्तीकरण यातून जो काही हिंदू मुस्लीम तंटा या देशात निर्माण झाला तो अतिशय लाजिरवाणा व अशोभनीय असा प्रकार भारताच्या इतिहासात लिहिला गेला त्यामुळे भारतातील सलोखाच बिघडला नाही तर समाज स्वास्थ्य देखील अनामिक रोगाने पछाडले. याचे भारताला दूष्परिणामच भोगावे लागले हे नक्कीच की काय म्हणून भारतातील राजकारण्यांनी देखील काही कलंकित कृत्ये करुन या रोगराईत भर टाकली परिणामी भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर तर बिघडलीच पण खुद्द भारतीयांच्या मनातही अस्वस्थतेचा ज्वालामुखी खदखदू लागला. ज्या जनप्रतिनिधींना आपण निवडून देतो ते देखील केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी जातीयतेची विषपेरणी करुन अफीम गांजासारखी जीवघेणी कलह, व्देष मत्सराची पिकं भारतात उगवण्याचा खटाटोप करु लागलीत, भ्रष्टाचारा सारख्या कर्करोगाने पुढच्या पिढ्या बर्बाद करण्याचे संस्कार भारतातील राजकारणी व नोकरशहांनी रुजवण्याचा सपाटा लावला भारतात जातीय दंगलीही घडून आल्यात अन् भ्रष्टाचाराचे इतिहासही लिहिल्या गेलेत यावर रामबाण औषध सापडत नव्हते नजीकच्या काळात भारतातील मानसिकतेबद्दल घडून आला, भारताला दहशतवादाचे खतपाणी पुरवणार्या पाकीस्तानवर जेव्हा दहशतवाद्यांचे बॉम्ब कोसळू लागले तेव्हा भारतातल्या मानसिकतेला बळ मिळण्यास सुरुवात झाली जातीयतेची कट्टरता पाळणार्यांनी भारतात नांग्या टाकल्यात हाच उपचार आपल्यालाही लागू होवू शकतो या धास्तीने कट्टरता म्यानात बंद करुन ठेवावी लागली. भारतातल्या काश्मीरच्या सीमेवरुन घुसण्याचा मार्ग बंद झाल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे पार कोलमडलेत राज्यकर्त्यांना देखील मतदारांनी निवडणुकांमध्ये चौदावे र
त्न दाखविल्याने त्यांच्याही जातीय विष पेरण्याच्या वाचा बंद होवू लागल्या नुकत्याच न्यायालयाने जो अयोध्येतील विवादीत जागे प्रकरणी निकाल दिला त्यानंतर या राजकीय पक्षांनी व देशातल्या कट्टरपंथियांनी जो आपला परंपरागत वाचाळ बोलण्याचा व्यवसाय मोडीत काढला त्यावरुन तरी भारतीय समाजमनाला लागलेला कलंक आता धुतल्या जात आहे ही बाब खुप समाधानाची आहे व यातूनच जे सुरवातीला नमूद केलय की भारतात सलोख्याचं वातावरण निर्माण होतय ते याच मानसिकतेमुळे झालेलं आहे हे म्हणायला खुप वाव राहतो. कट्टरपंथियांनी पाळलेली शांतता, राजकारण्यांनी पाळलेला संयम किंबहूना भारतातल्या जनतेने या निकाला नंतर दाखविलेला समंजसपणा हाच भारताच्या सलोखा टिकण्याला कारणीभूत ठरला त्यासाठी प्रत्येक भारतीयाच अभिनंदन करावेसे वाटते. आता भ्रष्टाचाराचा रोग अशा तर्हेनेच जर पळविण्याचे प्रयत्न केले तर भारतातल्या समृध्दीला चार चाँद लागल्या शिवाय राहणार नाहीत तसेही नुकतेच न्यायालयाने भ्रष्टाचारही एकदाचा कायदाच बनवून टाका असा उपहासात्मक टोला लगावला आहे व त्यातून राजकारणी व नोकरशहा जे भ्रष्टाचारात आकंठ बुडण्यात धन्यता मानतात ते बोध घेतीलच! असा विश्वास बाळगण्यास हरकत नसावी!
— अतुल तांदळीकर
Leave a Reply