माझा अत्यंत लाडका मित्र, प्रचंड कष्ट घेत घेत जेव्हा एक प्रतिभा संपन्न अभिनेता म्हणून मला मोठ्या पडद्यावर दिसला, तेव्हा त्याचा खूप अभिमान वाटणारी मैत्रीण म्हणून मला त्याला हे पत्र लिहावंसं वाटलं…आपल्या माणसांचं कौतुक करण्याची संधी कधीच सोडू नये असं मला नेहमी वाटतं..आपल्याला त्यांच्या बद्दल काय वाटतंय हे नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवावं..’व्हिक्टोरिया’ हा मराठीतील एक दर्जेदार भयपट अलिकडे प्रदर्शित झालाय…या निमित्ताने हे माझ्या मित्राकरता, आशय कुलकर्णी करता खास पत्र…
प्रिय आशय…..
आपली ओळख झाली २०११ साली..’मी राधिका’ या नृत्य नाट्याच्या निमित्ताने…प्रॅक्टिसेस ना तर भेटायचोच , पण त्यानंतरही मित्र म्हणून भेटत राहिलो..भरभरून गप्पा मारायचास तू.. नवीन काय करतोयस त्याबद्दल खूप काही सांगायचास.. स्टेज शोज असोत, नाटक असो, अगदी फोटो शूट असो.. सगळी कामं अगदी मनापासून करायचास..तुझ्यामधल्या ठासून भरलेल्या एनर्जी चं मला नेहमी अप्रूप वाटत आलेलं आहे.. आशय ला मी कधीही थकलेला, उदास, निराशावादी पाहिलेलं नाही.. आणि असं जरी तुला कधी वाटलं असेल तरी या सगळ्याला झुगारून तू इथवर आलेला आहेस हे नक्की..
आज हे सगळं लिहिण्याचं निमित्त ..’व्हिक्टोरिया’ …आज सिनेमा गृहात जाऊन आम्ही दोघांनी चित्रपट बघितला..
काही वर्षांपूर्वी ‘आय ॲम नॉट चॅप्लिन’ च्या निमित्ताने यशवंतराव ला तुला पाहिलेलं.. तेव्हा खात्री पटली.. आपला पोरगा ‘लंबी रेस का घोडा है’..आणि खरं सांगू आशय.. तेव्हा तिथे बसल्या बसल्या नक्की वाटलेलं, आज नाटकात तुला पाहत्ये तसं मोठ्या पडद्यावर सुद्धा तुला पाहणार लौकरंच ..नाटक संपल्यावर back stage येऊन घट्ट मिठी मारलेली तुला..आज चित्रपट संपल्यावर वाटलं ,पडद्यातून बाहेर बोलावून तुला अशीच घट्ट मिठी मारावी आणि सांगावं..”किती मोठा झालास तू!!!
चित्रपट पाहताना हे सगळं आठवलं…
स, रे, ग, म, प च्या जाहिरातीत झी मराठी वर आशय दिसतोय..फार भारी वाटलेलं रे…’ ‘किती सांगायचंय मला’ मधला तुझा ‘ओम’ पाहून मेसेज केलेला मी.. तेव्हा तू म्हणालेलास, ” कौतुक होतंय, घरोघरी पोहोचता येतंय, पण पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत’. हे ऐकून खूप कौतुक वाटलेलं तुझं ..डॉ. सुयश चं fan following दिसायचं.. माझ्या विद्यार्थिनी तुझ्या जबरी फॅन बरं का!…डॉ. सुयश कसला भारीये म्हणायच्या तेव्हा मी अभिमानाने त्यांना सांगायचे.. ,”तुमचा डॉ. सुयश आपला मित्र आहे.. “
‘भाडिपा’ च्या सिरीज मधला कॅलिफोर्नियाचा dashing मुलगा, जो फक्त three कारणांसाठी India त येतो..हाच कोथरूड चा जावई असं वाटलेलं, इतकं छान , सहज काम केलंयस तू….???
काळ कितीही पुढे जावो..टीव्ही वर दिसणारा हिरो आपला मित्र आहे सांगताना आजही कॉलर ताठ होते बरं !…???
वाईट याचं वाटतंय की तुझ्या या सगळ्या कामाचं कौतुक प्रत्यक्ष भेटून करता आलं नाही मला..
‘ व्हिक्टोरिया ‘ अनाऊन्स झाल्यापासूनच ठरवलेलं ..थियेटर ला जाऊनच बघायचा सिनेमा..तुला अभिप्राय कसा द्यावा विचार करत होते.. मला लिखाणाचं माध्यम सोपं वाटत व्यक्त व्हायला.. म्हणून हा लेखन प्रपंच..?
नुकता कॉलेज pass out झालेला, वेगवेगळी माध्यमं explore करणारा आशय, ते आज मजल दर मजल करत, प्रचंड कष्ट घेत, इथवर पोहचून मोठ्या पडद्यावर दिसणारा एक उत्तम अभिनेता आशय कुलकर्णी..क्या बात है!!.. सॉलिड आहेस तू..!!!
तुझा खूप अभिमान वाटतो..तुझी मैत्रीण म्हणून..
किती वर्षात आपण भेटलेलो नाही..!! लौकर भेट व्हावी अशी इच्छा आहे…! पुढील वाटचालीकरता शुभेच्छा आणि खूप प्रेम, तुला आणि सौ. Saniya ला सुद्धा….and…
अनेकोत्तम आशीर्वाद…मोठेपणाच्या नात्याने?..
-नेहमी तुझी आठवण काढणारी तुझी मैत्रीण ,गौरी.
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित , पुष्कर जोग, आशय कुलकर्णी व सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला एक अप्रतिम चित्रपट ‘व्हिक्टोरिया’..कालपासून सर्वत्र प्रदर्शित झालाय…सिनेमा गृहात जाऊनंच हा थरार अनुभवावा…
आवर्जून बघा…
— गौरी सचिन पावगी
Leave a Reply