मन भुंगा साद घाली
येऊ का रे माझ्या फुला
झुलवेन तुजला मी
करून हातांचा झुला
सरले बघ ऋतू कसे
बहरत गात वसंत आला
शृंगारत तुही बैस ऐसे
जणू तू एक धुंद प्याला
तुझी लाज अन संकोच थोडा
सारे काहीं जाणवते गं मजला
पण सोड सखे आता हा बेडा
जोडीनं फुलवू बघ बाग आगळा
तुझ्या प्रीतीच्या जोडीनं करू
संसार आपुला हा भला
न टोचेल कधी ईर्षेचा काटा
न कधी टोचेल शब्दांचा भाला
विश्वास ठेव सखे
सारा होईल अंत चांगला
समजुतीने संग राहू
मांडू आपला डाव एकला
— वर्षा कदम.
Leave a Reply