पॉलीसिस्टीक ओव्हेरियन सिण्ड्रोम (पीसीओएस) या आजाराची लक्षणे: १) अनियमित पाळी येणे व अति रक्तस्त्राव होणे. २) चेहऱ्यावर अधिक प्रमाणात मुरूम येणे. ३) नको त्या ठिकाणी केसांची अधिक वाढ होणे (चेहऱ्यावर, छाती/ ओटी-पोटावर इत्यादी) केसांची अधिक वाढ होते. ४) लठ्ठपणा. ५) सोनोग्राफी तपासणी केल्यास | बीजांडाकोशात गाठीचा समूह दिसतो (पॉलिसिस्टीक ओव्हरी). ६) रक्तातील संप्रेरकाच्या प्रमाणात बदल होणे. पुरुषांमध्ये | मोठ्या प्रमाणात आढळणारे संप्रेरक टेस्टोस्टेरॉन स्त्रीच्या रक्तात आढळते. ७) काही वेळा रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढणे. टाइप-२, मधुमेह अशा वेळी मान, छाती किंवा इतर ठिकाणी त्वचा काळी व जाडसर होते. ८) या सर्व बदलांमुळे वंध्यत्व, हृदयविकार, लठ्ठपणा, रक्तदाब इत्यादी व्याधी होऊ शकतात. सूचना- अशी काही लक्षणे आढळल्यास मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी दुर्लक्ष करू नये. पाळी अनियमित असण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा. थॉयराइड ग्रंथींची समस्या. पीसीओएस असणाऱ्या मुलींनी अनेक वेळा गर्भवती होण्यास वेळ लागू शकतो. तरी विवाहानंतर गर्भधारणा पुढे ढकलू नये. जर औषधे वेळेवरच सुरू केली किंवा जीवनशैलीत बदल केला गेला तर या आजारावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण करता येईल व जीवनमानाचा दर्जा अधिक सुधारण्यास मदत होईल.
उपचार: मासिकपाळी करण्याकरिता नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याने मराठी विज्ञा-हॉरमोनयुक्त औषधे काही काळ वजन जास्त असल्यास आहारावर नियंत्रण, तसेच व्यायाम करून वजन कमी करणे. मुरूम अथवा अनावश्यक केस कमी करण्यासाठी विशिष्ट हॉरमोनयुक्त औषधे व रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास योग्य ती औषधे घ्यावी लागतात.
डॉ. बिना जोशी
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply