निर्माते व भद्रकाली प्रॉडक्शनचे सर्वे सर्वा प्रसाद कांबळी यांचा जन्म २२ जून १९७४ रोजी मुंबई येथे झाला.
प्रसाद कांबळी हे जेष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव होत. खरे तर हे नाट्यक्षेत्र ते वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून मच्छिंद्र कांबळी यांच्या मुळे जवळून पाहत होते. पण त्यात सहभागी झाले नव्हते. पण आपल्या वडिलांच्या सारखा रंगभूमीवर अभिनय करावा, असे त्यांना कधी वाटले नाही. प्रसाद कांबळी यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल महाविद्यालयात झाले. लहान पणापासून घरात नाटक असल्याने नाटकाची आवड होतीच. त्या मुळे महाविद्यालयीन शिक्षणानंतर काही काळ त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. प्रसाद कांबळी यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून व्यवसायही सुरु केला होता व एका बाजूला रंगभूमीच्या जवळपास वावरायला लागले. ते जेव्हा वावरायला लागले तेव्हा ‘वस्त्रहरण’चे १७५ प्रयोग झाले होते. पण जेव्हा मच्छिंद्र कांबळी यांचे निधन झाले, तेव्हा भद्रकाली प्रॉडक्शनचे आता काय होणार, बंद होणार का ? अशा वावड्या उठल्या. तेव्हा प्रसाद कांबळी यांनी ठरवले ‘भद्रकाली प्रॉडक्शन’चे नाव सुरू राहिलेच पाहिजे. म्हणून नाट्यनिर्मितीचा काहीही अनुभव पाठीशी नसताना प्रसाद कांबळी या क्षेत्रात उतरले.
‘भद्रकाली’मधून त्यांचे पहिले नाटक ‘म्हातारे जमीन पर.’ हे होते. पण काही प्रयोगांनंतर त्यांनी ते बंद केले. मच्छिंद्र कांबळी यांचे गेले तेव्हा ‘वस्त्रहरण’चे ४९२३ प्रयोग झाले होते. त्यांचे स्वप्न होते की या नाटकाचे किमान पाच हजार तरी प्रयोग व्हावेत. ते स्वप्न प्रसाद कांबळी यांना सर्वप्रथम पूर्ण करायचे होते. ‘वस्त्रहरण’चा पाच हजारावा प्रयोग त्यांनी केला. ‘वस्त्रहरण’चा पाच हजारावा प्रयोग कुणीही विसरू शकणार नाही, असा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला. सर्वच मोठय़ा कलाकारांनी यामध्ये भाग घेतला आणि या नाटकाचे ५०० रुपयांचे तिकीट काळाबाजारात तब्बल १२ हजार रुपयांना विकले गेले होते. फेब्रुवारी २०२० पर्यंत वस्त्रहरण या नाटकाचे ५२५५ प्रयोग झाले आहेत. आज ४० वर्षांनंतर ही हे नाटक प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकांना आपलंसं वाटतं हेच या नाटकाचं यश आहे. ‘भय्या हातपाय पसरी’चे ५०० हून अधिक प्रयोग झाले. ‘म्हातारे जमीं पर’चे अनेक प्रयोग झाले. त्यानंतर ‘सुखांशी भांडतो आम्ही’ आणि ‘भारत भाग्यविधाता’चे प्रयोग पण अनेक प्रयोग झाले. प्रसाद कांबळी व भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘देव बाभळी’ हे नाटक सध्या जोरात चालू आहे. याचे ३०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
‘देव बाभळी’ या नाटकाला ३९ पुरस्कार मिळाले आहे. (सध्या लॉकडाऊन मुळे प्रयोग बंद आहेत.) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रसाद कांबळी काम सध्या बघत आहेत. बॅकस्टेज आर्टिस्ट ते नाट्यपरिषदेचे अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.
भद्रकाली प्रॉडक्शनची नाटके.
ती म्हणजे चाकरमानी, केला तुका झाला माका, अग्निदिव्य, वस्त्रहरण, अफलातून, मालवणी सौभद्र, घास रे रामा, राम तुझी सीता माऊली, पांडगो इलो रे बा इलो, रातराणी, चालगती, पद्मश्री धुंडीराज, लाज वाटते, बंद करा, सावळोगोंधळ, आली ती बेस्ट, तुमचं ते आमचं, करतलो तो भोगतलो, वाजले किती?, पोलीस तपास सुरू आहे, उजाडतलाच, पप्पा सांगा कुणाचे, विमानहरण, येवा, कोकण आपलाच आसा, चला, घेतला खांद्यावर, पाहू कशाला कुणाकडे, भारत भाग्य विधाता,माझं छान चाललंय ना, मॅड फॉर इच अदर, हलकं फुलकं, वय वर्षे पंचावन्न, सदाचा बाप ४२०, माझे पती छत्रपती, आता होऊनच जाऊ द्या, फादर माझा गॉड फादर, अनधिकृत, लग्नकर्ता विघ्नहर्ता, जाऊ तिथे खाऊ, मागणी तसो पुरवठो, भैया हातपाय पसरी, म्हातारे जमीन पर, हा शेखर खोसला कोण आहे?, सुखाशी भांडतो आम्ही, समुद्र, बेचकी, नांदी, आम्ही सौ.कुमुद प्रभाकर आपटे, देव बाभळी, सोयरे सकाळ, ‘गुमनाम हे कोई’ हे ५७ वे नाटक.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply