कांचन अधिकारी यांनी अभिनेत्री म्हणून “बाळाचे बाप ब्रम्हचारी‘, “प्रेमासाठी वाट्टेल ते‘ चित्रपटांत काम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका “दामिनी‘ दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय ठरली. तब्बल आठ वर्षे ती नंबर वन होती. त्यानंतर त्यांनी “चोरावर मोर‘, “उचापती‘ अशा काही मराठी मालिकांबरोबरच हिंदीतील “सब कुछ हो सकता है‘, “हसी वो फसी‘, “अभी तो मैं जवॉं हूँ‘ अशा काही मालिकांचे दिग्दर्शन केले. मराठी व हिंदी मिळून तब्बल पाच हजारांहून अधिक एपिसोड्स त्यांनी दिग्दर्शित केले. “मानिनी‘, “दोघांत तिसरा आता सगळे विसरा‘, “बाप रे बाप डोक्याूला ताप‘, “तुक्याड तुकविला नाग्या नाचविला‘, “मोकळा श्वाास‘ आणि “हुतूतू‘ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. “मानिनी‘ या चित्रपटाचे तब्बल बारा दिवस दुबईत चित्रीकरण झाले. दुबईत चित्रित झालेला हा पहिला मराठी चित्रपट. त्यांनी दिग्दर्शित केलेला “किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी‘ हा चित्रपट खूपच प्रेक्षकांना भावला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply