नवीन लेखन...

प्रा. एम. एम. शर्मा

१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले. रसायन अभियांत्रिकीमधील सर्व शाखांमध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. रासायनिक प्रक्रिया घडत असताना संयंत्रामधील सर्व घटकांच्या टप्प्यांत निरनिराळ्या होणाऱ्या मास ट्रान्स्फरच्या हालचालींवर त्यांनी केलेले संशोधन जागतिक मान्यतेचे ठरले.

‘निरनिराळ्या अवस्थेतील रसायनांच्या प्रक्रियांवरील संशोधन, उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) आणि त्यांच्या विविध स्वरूपांचे परिणाम, आयन प्रक्रिया उत्प्रेरक (आयन एक्स्चेंज कॅटॅलिस्ट) आणि रासायनिक प्रक्रियातील विघटन या विषयात त्यांनी मौलिक संशोधन केले. गुंतागुंतीच्या दोन किंवा जास्त अवस्थेतील रासायनिक प्रक्रियेवर त्यांनी संशोधन केले व त्यायोगे अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवली. त्यांनी मोजमापनाकरिता शोधून काढलेल्या नवीन पद्धतीने अतिशीघ्र रासायनिक क्रियांची गती मोजणे शक्य झाले. पदार्थांच्या रासायनिक संयंत्रात पदार्थांच्या शुद्धीकरिता पदार्थ शोषण व त्याचे विघटन या क्रियांना फार महत्त्व असते व अशा प्रकारच्या
प्रक्रियांसाठी, मूलभूत संशोधनातून त्यांनी गणिती सूत्रे तयार केली.

दोन द्रव पदार्थांतील मिश्रण व त्याचा रासायनिक प्रक्रियांचा उपयोग या विषयातही त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. रासायनिक पदार्थांच्या शुद्धीकरणाकरिता उपयोगात येणाऱ्या प्रक्रिया ऊर्ध्वपातन, स्फटिकीकरण इत्यादींमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करून त्यांचा उपयोग रसायन अभियांत्रिकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात केला. प्रा. शर्मा यांनी ७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. त्यांना इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने फेलो म्हणून स्वीकारले असून भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा नागरी सन्मान दिला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. जे. बी. जोशी यांच्यासारखे त्यांचे विद्यार्थी दिगंत कीर्तीचे आहेत, तर मुकेश अंबानींसारखा त्यांचा विद्यार्थी आज भारतातील अव्वल दर्जाचा उद्योगपती आहे

अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..