प्रा.तापस यांनी सुरवातीच्या काळात काही काळ मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी केली.प्रा विजय तापस ह्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात तीस वर्ष मराठीचं अध्यापन केले.विजय तापस हे साहित्य-संशोधक, संपादक,नाट्यसमीक्षक व नाट्य-अभ्यासक म्हणून परिचित होते.रुईयातील ‘नाट्य-वलय’ संस्थेचे ते बरीच वर्षे मार्गदर्शक होते.विजय तापस यांचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे संशोधनावर आधारित अभ्यासपूर्ण लेखन हे होय. मराठीतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांतून त्यांनी साहित्य-कला-संस्कृतीच्या संदर्भात सदरलेखन केले आहे.२०२२ मध्ये लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत विस्मृत नाटकांवर लिहिलेली त्यांची लेखमाला ही सामाजिक दस्तऐवजाचा उत्तम नमुना म्हणून आहे.
२०२३ मध्ये त्यांनी संपादित केलेला ‘सत्यकथा निवडक कविता या दोन खंडांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.प्रा.विजय तापस यांना दस्तावेज निर्माण करण्यात आणि एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासात, संशोधनात विशेष रस होता.संतकविता,प्राचीन साहित्य,पोथीसाहित्य आणि जागतिक रंगभूमी या विषयांत त्यांना विशेष रस होता.ग्रंथसंपादक,भाषांतरकार,साहित्य-कला-संस्कृती क्षेत्रातील संशोधक,अभ्यासक,जाहिरात लेखक,माहितीपटांचे लेखक या नात्याने त्यांनी दीर्घकाळ काम केले.विजय तापस यांनी ‘लोकसत्ता’, ‘सामना’,’लोकमत’,’सकाळ’या वृत्तपत्रांतून साहित्य,समाज,संस्कृती आणि दुर्मीळ ग्रंथांशी संबंधित लेखन व स्तंभलेखन केले.’सत्यकथा निवडक कविता’या दोन खंडात प्रकाशित झालेल्या प्रकल्पाचं आणि श्री.पु.भागवत यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित झालेल्या ‘सृजनव्रती श्री.पु.भागवत’ या बृहग्रंथाचे विजय तापस हे सहयोगी संपादक राहीले आहेत.नव्या जुन्यातील जे जे उत्तम आहे,ते स्वीकारुन अभ्यासोनी प्रगटावे हे त्यांचं वैशिष्ट्य होते. यातूनच त्यांनी आफ्रो-अमेरिकन कवयित्री माया ॲंजेलोच्या कवितांचा भावानुवाद केला,तर एकीकडे शंकराचार्यांच्या स्तोत्रांना मराठीचा साज चढवताना त्यांचं रुपांतर स्वतंत्र काव्यात केलं आहे. या निवडक स्तोत्र जागराचं ‘देवगान’ हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.प्रा विजय तापस यांचा विठ्ठल हा खास जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या शब्दांतून विठ्ठल आणि त्याचे भक्त आपल्याला वेगळ्याच रुपात भेटतात.रुईया महाविद्यालयाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यही काही काळ त्यांनी केले.ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.मुंबई विद्यापीठात एम.फील च्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असत.खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे या त्यांच्या विद्यार्थिनी होत.त्यांच्या पत्नी प्रा.पुष्पा राजापुरे-तापस या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख आहेत.
विजय तापस यांचे १ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply